Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डोंबिवलीत तीन मजली इमारती कोसळली

डोंबिवली प्रतिनिधी - डोंबिवली पूर्व येथे आयरे -दत्त नगर भागातील एका तीन मजली इमारत कोसळली आहे. ही इमारत जुनी झाली असून आदिनारायण असे या इमारत

ब्राह्मण समाज प्रतिनिधी-शरद पवार भेटीचा अन्वयार्थ !
लोकसेवा हक्‍क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : आयुक्‍त चित्रा कुलकर्णी
… ते आपल्या कर्माने मरणार : मुख्यमंत्री ठाकरे

डोंबिवली प्रतिनिधी – डोंबिवली पूर्व येथे आयरे -दत्त नगर भागातील एका तीन मजली इमारत कोसळली आहे. ही इमारत जुनी झाली असून आदिनारायण असे या इमारतीचे नाव आहे. ही इमारत आदिनारायण सोसायटीत असून इमारत जुनी असल्यामुळे कल्याण- डोंबिवली महापालिकेने या इमारतीतील रहिवाशांना दुसरी कडे स्थलांतरित होण्याची नोटीस देण्यात आली होती.  

नोटीस बजावल्या काही रहिवाशांनी सुरक्षितस्थळी जाण्याच्या निर्णय घेतले असून ते सुरक्षित स्थळी गेले होते. तर काही रहिवाशी अद्याप देखील वास्तव्यास होते. काल रात्रीपासून पाऊस सुरु आहे. आज इमारत कोसळली आहे. या इमारतीखाली ढिगाऱ्यात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

या घटनेची माहिती मिळतातच तातडीने अग्निशामक दलाचे जवान पोलीस आणि महापालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरु झालं आहे. बचाव पथकाकडून ढिगाऱ्याला बाजूला करण्याचे काम सुरु झाले आहे.ढिगाऱ्यातून रहिवाश्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. ढिगाऱ्यातून नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून अद्याप त्यात दोन नागरिक अजून देखील अडकले आहे.

COMMENTS