Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एक हजार सभासद केले जिवंत: दिलेला शब्द पाळला – देविदास पिंगळे 

नाशिक - नाशिक शेतकी तालुका संघाची १७०० संस्थापक सभासदांनी  पंचवीस रुपये वर्गणी काढून आपले योगदान देत संस्था उभी केली. यातील संचालक मंडळाने एक हज

RRR चित्रपटातील नाटू – नाटू या गाण्याला मिळाला ऑस्कर अवॉर्ड
भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गालाही ब्रेक !
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दीड लाख आणि दागिने घेऊन नवरी फरार

नाशिक – नाशिक शेतकी तालुका संघाची १७०० संस्थापक सभासदांनी  पंचवीस रुपये वर्गणी काढून आपले योगदान देत संस्था उभी केली. यातील संचालक मंडळाने एक हजार सभासदांना जिवंत केले, निवडणुकी दरम्यान दिलेला शब्द पाळला असे प्रतिपादन माजी खासदार तथा नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांनी केले. ते शिंदे पळसे येथील खते बी बियाणे डेपोच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे, संचालक राजाराम धनवटे,धनाजी पाटील,युवराज कोठूळे,  तानाजी करंजकर, प्रल्हाद काकड, जगन्नाथ कटाळे, विलास कड,संचालिका सविता तुंगार, माजी संचालक संजय तुंगार,शेतकी तालुका संघाचे सभापती दिलीप थेटे, उपसभापती दिलीप चव्हाण,संचालक शरद गायखे, बबन कांगणे ,रावसाहेब कोशिरे,विष्णू थेटे ,भिकाजी कांडेकर,शांताराम माळोदे,दीपक हगवणे, आशा गायकर, जयराम ढिकले, वाळू  काकड, ढवळू फसाळे,,भाऊसाहेब भावले, नवनाथ कोठूळे, संजय चव्हाण, वामनराव चुंभळे, मीराबाई लभडे,  शंकरराव पिंगळे, योगेश रिकामे,व्यवस्थापक संदीप थेटे उपस्थित होते. तसेच  सुधाकर गायधनी, जगन्नाथ आगळे, खंडेराव गायधानी बाळासाहेब सरोदे, अनिल ढेरींगे, बाजीराव जाधव, भाऊराव तुंगार, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते  सुनील पवार, अशोक खालकर,  दीपक गायधनी , गणेश गायधनी नवनाथ गायधनी , रामकृष्ण झाडे, कांताबाई गायखे, लीलाबाई गायधनी यांचे सह पंचक्रोशीतील शेतकरी बांधव, सोसायटी   सभासद आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले पुढे देविदास पिंगळे म्हणाले की, नाशिक शेतकी तालुका संघ हा शेतकऱ्यांच्या सेवेसाठी असून नफा कमवणे हा उद्देश नाही. डेपोच्या माध्यमातून  शेतकऱ्याला खते बी बियाणे वाजवी दरात उपलब्ध करून देणे हे परम कर्तव्य आहे. शेतकऱ्याला दोन पैसे हाती लागतील फायदा होईल या दृष्टीने कामकाज सुरू आहे.

माजी संचालक संजय तुंगार म्हणाले की, शेतकी तालुका संघाच्या निवडणुकीत शिंदे पळसे भागात दोन जागा मिळाल्या होत्या अन् त्या निवडून आल्या. शेतकरी हितासाठी शेतकी तालुका संघ काम करत आहे. शेतकऱ्याची होणारी फसवणूक टाळण्यासाठी खते बी बियाणे तालुका संघाच्या डेपोतून खरेदी करत हातभार लावणे आवश्यक आहे. प्रास्ताविक संचालक शरद गायखे यांनी केले. सूत्रसंचलन यांनी केले तर आभार संचालक भाऊसाहेब थेटे यांनी मानले.

शेतकरी रविंद्र गायधनी म्हणाले की, वीस वर्षापासून शेती करत आहे. रासायनिक खते आज रोजी महाग मिळत आहे. शेतकरी लिंकिंग नसावी व खते बी बियाणे स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली.

COMMENTS