Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे येऊ शकते तिसरी लाट

नवी दिल्ली ः देशातच नव्हे तर जगभरात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असल्यामुळे चिंतेेचे वातावरण आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग वाढू नये, यासाठी त्या त्या देशांनी कड

कराड तहसिल कार्यालयातील त्या प्रकरणात कोण-कोण अडकणार?
सैनिक स्कूलच्या प्रवेश पात्रता परीक्षेत कुडाळ शाळेचे आठ विद्यार्थी यशस्वी
विकास आघाडीतर्फे 11 कोटी निधीला विरोध करणार्‍या नगरसेवकांच्या दारात ढोल-ताशांचा गजर

नवी दिल्ली ः देशातच नव्हे तर जगभरात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असल्यामुळे चिंतेेचे वातावरण आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग वाढू नये, यासाठी त्या त्या देशांनी कडक निर्बंध लादले असले तरी, रुग्णांच्या संख्येचा वेग वाढला आहे. लवकरच या व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. फेब्रुवारी महिन्यात ही तिसरी लाट फेब्रुवारी महिन्यात उच्चांक गाठू शकते, असा इशारा आयआयटीमधल्या अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
मागच्या दोन लाटांप्रमाणेच सौम्य लॉकडाउन, गर्दीवर निर्बंध, रात्रीची संचारबंदी अशा प्रकारचे उपाय करुन विषाणूसंसर्गाला उच्चांक गाठण्यापासून रोखता येईल, असंही अभ्यासकांचे म्हणणे आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरात चिंतेचं वातावरण आहे. करोना विषाणूसंदर्भातला अभ्यास करणारे आयआयटीमधले शास्त्रज्ञ मणिंद्र अग्रवाल यांनी हा अंदाज वर्तवला आहे. मात्र ओमायक्रॉनमुळे येणारी ही तिसरी लाट दुसर्‍या लाटेपेक्षा सौम्य स्वरुपाची असेल, असा अंदाज अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. अग्रवाल म्हणाले, ओमायक्रॉनच्या अनुषंगाने आमचा सध्याचा अंदाज असा आहे की देशात फेब्रुवारीपर्यंत तिसरी लाट दिसू शकते परंतु ती दुसर्‍या लहरीपेक्षा सौम्य असेल. आतापर्यंत आपण पाहिले आहे की ओमायक्रॉनची तीव्रता डेल्टा व्हेरिएंटइतकी नाही. ओमायक्रॉनचा उगम जिथे झाला त्या दक्षिण आफ्रिकेतल्या रुग्णसंख्या तसंच संसर्गावर नीट लक्ष ठेवून त्याचा अभ्यास केला जाईल. दक्षिण आफ्रिकेत रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांच्या संख्येत अद्यापही वाढ नोंदवण्यात आलेली नाही. ज्यावेळी रुग्णसंख्या आणि रुग्णालयात दाखल होणार्‍यांच्या संख्येविषयीची अधिक माहिती मिळेल, त्यावेळी अधिक ठामपणे निष्कर्ष काढता येईल, असेही अग्रवाल म्हणाले. नव्या व्हेरिएंटचा प्रसार वेगाने होत असला तरी त्याची तीव्रता डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे मागच्या दोन लाटांप्रमाणेच सौम्य लॉकडाउन, गर्दीवर निर्बंध, रात्रीची संचारबंदी अशा प्रकारचे उपाय करुन विषाणूसंसर्गाला उच्चांक गाठण्यापासून रोखता येईल, असेही अग्रवाल म्हणाले.

COMMENTS