लखनऊच्या हॉटेलमध्ये भीषण आग.

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

लखनऊच्या हॉटेलमध्ये भीषण आग.

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

 लखनऊ प्रतिनिधी - पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन आज होणार आहे. त्याआधी लखनऊमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. लखनऊच्या हॉटेलमध्ये मोठा अग्नितांडव पाहायला

तरडगांव येथील जयश्री अडसूळ बेपत्ता
जिल्हा बँकेचे लेखा परीक्षण करणार खासगी लेखा परीक्षक ; 26 लेखा परीक्षकांची नेमणूक
बीड जिल्हाभूमि अभिलेख अधिक्षक शिंदे साहेबाची केज तालुक्यावर वक्रदृष्टी केजचे उप अधिक्षक पद रिक्तच

 लखनऊ प्रतिनिधी – पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन आज होणार आहे. त्याआधी लखनऊमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. लखनऊच्या हॉटेलमध्ये मोठा अग्नितांडव पाहायला मिळाला. हॉटेलमध्ये आगीचा भडका उडाला यामुळे तिथे गोंधळाचं वातावरण होतं. लोक आपला जीव वाचवण्यासाठी खिडकीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत होते. उत्तर प्रदेशातील लखनऊमधील हजरतगंज इथल्या हॉटेलमध्ये भीषण आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या  घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर आतमध्ये अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करणं सुरू आहे.

COMMENTS