कोल्हापूर - पुणे बंगळुरु महामार्गावर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण ठार झाला तर तिघे गंभीर जखमी झालेत. ट्रकने दुसऱ्या एका ट्रक
कोल्हापूर – पुणे बंगळुरु महामार्गावर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण ठार झाला तर तिघे गंभीर जखमी झालेत. ट्रकने दुसऱ्या एका ट्रकला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. कोल्हापूर जवळील उचगाव परिसरात अपघाताची ही घटना घडली. कोल्हापूरच्या उचगाव इथं पुणे बंगळुरु हायवेवरुन काही जण रस्ता ओलांडत होते. यासाठी हायवेरुन जाणारा एका ट्रकने ब्रेक दाबला आणि वाहन थांबवलं. पण या ट्रकमागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकच्या चालकाला वेग नियंत्रित करता आला नाही आणि अनर्थ घडला. समोरच्यांना वाचवण्याच्या नादात ट्रकला मागून जबर फटका बसला. मागून येणारा ट्रक समोरील ट्रकवर जोरात आदळला. ही धडक इतकी भीषण होती, की ट्रकच्या समोरच्या बाजूला अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली होती . मागून धडक दिलेल्या ट्रकमधील चार जणांपैकी एकाचा जागीच जीव गेला. तर तीन जण गंभीररीत्या जखमी झाले. यातील जखमींना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

COMMENTS