Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जन्मदात्याकडूनच दहा वर्षीय मुलीचा विनयभंग

पुणे ः जन्मदात्या पित्यानेच रहात्या घरात दहा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील येरवाडा भागात ही घटना घडली. याप्रकरणी

Filmy Masala : मी आतमध्ये येऊन चोपीन एकएकाला (Video)
महानगरपालिकेच्या कार्यालयात भरवले खड्ड्यांचे प्रदर्शन…
प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार | LOK News 24

पुणे ः जन्मदात्या पित्यानेच रहात्या घरात दहा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील येरवाडा भागात ही घटना घडली. याप्रकरणी मुलीच्या आई वडीलांविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात विनयभंग व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सोमवारी पोलिसांनी दिली. ही घटना डिसेंबर 2018 ते आतापर्यंत वेळोवेळी घडला आहे.
पीडित मुलीने घटनेची पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपी हे तिचे आईवडीलच आहेत. मुलीच्या आईने घरकामावरून वारंवार मुलीला मारहाण करत शिवीगाळ केली. वडीलांनी तिच्या समोर अश्‍लील कृत्य करू लागल्याने मुलगी घाबरुन किचन मध्ये पळून गेली. परंतू, तिचे वडील तिच्या पाठीमागून अर्धनग्न अवस्थेत येऊन त्यांनी तिचे कपडे उतरवत तिच्याशी शारिरिक जवळीक साधली. मुलगी घरातील फरशी पुसत असताना तिच्या वडीलांनी तिच्या समोर बसून मुलीकडे वाईट नजरेने पाहिल्याचेही याआधी घडले असल्याचे समोर आले. याबाबतची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी दाखल होत मुलीच्या वडीलांना अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास येरवडा पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक एस गाताडे करत आहेत. कोंढवा परिसरातील एका सोसायटीत राहणारा तरुण हा आरडाओरड करत असल्याने त्यास समजवून सांगण्यासाठी साोसायटीत राहणारी एक 42 वर्षीय महिला गेली होती. त्यावेळी दोन तरुणांनी त्यांच्या शरीरास वाईट हेतूने स्पर्श करत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात क्यले देवळिन पॉपकीस्स (वय-23) व कर्ट ब्यलीन पॉककीस्स (26) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS