Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मांजरसुंबा गावामध्ये आढळला दहा फुटाचा अजगर

सापांना मारू नका सर्प मित्राना कळवा-वाघमारे

बीड प्रतिनिधी - बीड तालुक्यातील मांजरसुबां गावात लोकवस्ती मध्ये अजगर दिसला असता लोकांनी घाबरू त्याला मारण्याच्या तयारीत होते परंतु त्यानी सर्पमि

मानवी चूका आणि पूरस्थिती
समांथा रुथ प्रभूने हैदराबादमध्ये विकत घेतला आलिशान फ्लॅट
लोहा तालुक्यातील 12 ग्रामपंचायती अंतर्गत 14 रिक्त जागांचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील मांजरसुबां गावात लोकवस्ती मध्ये अजगर दिसला असता लोकांनी घाबरू त्याला मारण्याच्या तयारीत होते परंतु त्यानी सर्पमित्र दीपक वाघमारे यांना माहिती दिली असता सपाला मारू नका असें सांगून सर्पमित्र टीम मांजरसूंबां गावी गेल्यावर अजगर झाडा झुडपात मध्ये बसला पण सर्प मित्र टीमने त्याला पकडून इमामपूर फ़ॉरेस्ट मध्ये सोडण्यात आले अजगर चे अन्न- ससा – बकरी – हरिण आणि त्या सारखे प्राणी, पक्षी आणि त्यांची अंडी किंवा पिल्ले, सरडे- पाली – सापसुरळ्या किंवा त्यांची अंडी वर्णन-अजगर हा भारतात आढळणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे, भक्ष्याच्या शरीरावर विळखा घालून गुदमरून मारतो आणि नंतर भक्ष्याला गिळायला सुरुवात करतो. त्याच्या त्वचेवर गुळगुळीत आणि चमकदार खवले असतात. पाठीवर फिकट मातकट रंगाच्या पार्श्वभूमीवर गडद तपकिरी रंगाचे ठिपके, पट्टे आणि वेडेवाकडे ठिपके असतात. पोटाच्या बाजूला खवल्यांचे रुंद पट्टे असतात. डोळे पिवळे असून बाहुल्या आडव्या असतात. प्रौढ अजगराच्या गुदद्वाराजवळ दोन पायांच्या अवशेषांची दोन नखे स्पष्टपणे दिसतात. आतल्या बाजूला या नखांना लागून पायांची घटलेली हाडेसुद्धा असतात. अजगराच्या वरच्या ओठावरील खाचांना उष्णतेची संवेदनशीलता जास्त असते. त्यामुळे या खाचांद्वारे अजगराला रात्रीच्या अंधारात गारवा असताना उष्ण रक्ताच्या भक्ष्याची जाणीव होते. दीपक वाघमारे,विशाल मिसळे,जयदीप ओव्हाळ,सागर खांडे,निलेश शृंगारे,अविनाश माने,आकाश निर्मळ,अजय डाके,सचिन साळवे.

COMMENTS