नगर : गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून यावर्षी देखील शहरातील श्रमिक कामगार व मजुरांना दिवाळी फराळचे मोफत वाटप
नगर : गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून यावर्षी देखील शहरातील श्रमिक कामगार व मजुरांना दिवाळी फराळचे मोफत वाटप केले जाणार आहे. कष्टकरी मजुरांची दिवाळी गोड करण्यासाठी घर घर लंगर सेवेच्या वतीने दिवाळी फराळसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
शहर आणि आसपासच्या भागात रस्ते, पूल आणि इतर सार्वजनिक प्रकल्पांवर काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांनाही दिवाळीचा आनंद साजरा करता यावा या उद्देशाने लंगर सेवेच्या माध्यमातून त्यांना फराळचे वाटप केले जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मजूरांचे घर दिव्यांनी प्रकाशमान करुन दिवाळीचा सण त्यांना साजरा करता येणार आहे.
त्याचबरोबर कामगारांना मिठाई, दिवे आणि फटाके वितरित करण्याचा संस्थेचा मानस आहे. दिवे, फटाके व फराळचा समावेश असलेल्या एका किटची किंमत 50 अंदाजे रुपये असून, प्रत्येक कामगारांना ही किट वितरीत केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी मोठा खर्च अपेक्षित असून, दानशूर व्यक्तींना या सामाजिक उपक्रमासाठी हातभार लावण्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी मदत करु इच्छिणाऱ्यांना तारकपूर येथील घर घर लंगर सेवेचे अन्नछत्रालय, हरजीतसिंह वधवा व प्रितपालसिंह धुप्पड यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
COMMENTS