Homeताज्या बातम्यादेश

विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण

तिसरीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण केली जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकांनाही शिवीगाळ केली

नवी दिल्ली प्रतिनिधी  - विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण वाढू नये म्हणून अनेक शाळा त्यांना गृहपाठ देत नाहीत. हसत-खेळत शिक्षण देण्यावर सध्या मोठ्या

व्यंगचित्र हा मानवी मनाचा आरसा – अरविंद गाडेकर
दोषी पोलिस अधिकार्‍यांना सेवेतून बरखास्त करा : डॉ. हुलगेश चलवादी
प.बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या

नवी दिल्ली प्रतिनिधी  – विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण वाढू नये म्हणून अनेक शाळा त्यांना गृहपाठ देत नाहीत. हसत-खेळत शिक्षण देण्यावर सध्या मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. पण उतर प्रदेशातील कानपूरच्या शाळेत मात्र होमवर्क पूर्ण न करणाऱ्या तिसरीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता त्यानं विद्यार्थ्याचे केस उपटून हातात दिले व आई-वडिलांना जाऊन केस दाखव, असा दम भरला. जाब विचारण्यासाठी शाळेत गेलेल्या पालकांनाही शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार घडला. या प्रकरणात शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS