Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपामध्ये उभारणार सिंहासनाधिष्ठीत शिवपुतळा

उद्या शिवजयंती दिनी होणार भूमिपूजन, मनपाद्वारे तयारी सुरू

अहमदनगर/प्रतिनिधी ः यशवंत कीर्तिवंत...सामर्थ्यवंत वरदवंत...पुण्यवंत नीतिवंत...जाणता राजा...असा जगभरात लौकिक असलेले श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी मह

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मनोंद असलेले मोडी अप्रकाशित पत्र उजेडात
पोलिस कारवाईनंतरही कोतुळमध्ये मटका सुरूच
खेळाडूंना भरपूर प्रोत्साहन देणाऱ्या सारडा महाविद्यालयास पूर्ण सहकार्य : जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले

अहमदनगर/प्रतिनिधी ः यशवंत कीर्तिवंत…सामर्थ्यवंत वरदवंत…पुण्यवंत नीतिवंत…जाणता राजा…असा जगभरात लौकिक असलेले श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठीत पुतळा अहमदनगर महापालिकेच्या प्रांगणात उभारण्यात येणार आहे. उद्या रविवारी (19 फेब्रुवारी) शिवजयंतीच्या मुहूर्तावर या पुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. महापालिकेद्वारे या सोहळ्याचे नियोजन सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आहे.

अहमदनगर महापालिकेच्या नगर-औरंगाबाद महामार्गावरील नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर आरुढ पुतळा बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी 19 फेब्रुवारी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजी राजे महाराज यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन होणार आहे. यावेळी आमदार संग्राम जगताप व महापौर रोहिणी ताई शेंडगे यांच्यासह महापालिकेचे सर्व नगरसेवक व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पारंपरिक ढोल-ताशाच्या गजरात व मोठ्या उत्साहात हा भूमिपूजन समारंभ होणार आहे.

भूमिपूजन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी नुकतीच नियोजनाची बैठक घेतली. यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम, माजी मनपा विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसेवक अविनाश घुले, गणेश कवडे, प्रकाश भागानगरे, सचिन शिंदे, शाम नळकांडे तसेच निखिल वारे, अजिंक्य बोरकर,बाळासाहेब पवार, संतोष गेनाप्पा, शहर अभियंता संतोष पडागळे, श्रीकांत निंबाळकर, मनोज पारखी उपस्थित होते. यावेळी भूमिपूजन सोहळ्याच्यादृष्टीने आवश्यक तयारीच्या सूचना महापौर शेंडगे यांनी दिल्या.

ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या भूमिपूजनानिमित्त पारंपरिक पद्धतीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये ढोल-ताशे व झांज पथकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पोवाड्यांचेही सादरीकरण होणार आहे. तसेच फटाक्यांची आतषबाजी व मनपा प्रशासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. हा भव्यदिव्य कार्यक्रम महापालिकेसमोर औरंगाबाद महामार्गावर होणार आहे

COMMENTS