Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छावा संघटनेच्या वतीने नाशिक मनपा ला दिले निवेदन  

नाशिक प्रतिनिधी - शहरात महापालिकेतर्फे पावसाळापूर्व नालेसफाई गटारी साप करण्यात आल्याचे सांगत आहे परंतु नाशिक शहरात कुठेही नालेसफाई तथा गटारी

सातारा जिल्हा वार्षिक योजनेसाठी 400 कोटी रुपयांचा निधी : उपमुख्यमंत्री
अबितखिंडमध्ये 500 झाडांचे वृक्षारोपण
संदीप वराळ खून प्रकरण लवकर निकाली काढा

नाशिक प्रतिनिधी – शहरात महापालिकेतर्फे पावसाळापूर्व नालेसफाई गटारी साप करण्यात आल्याचे सांगत आहे परंतु नाशिक शहरात कुठेही नालेसफाई तथा गटारी साप झालेल्या नाहीत नाशिक शहरात पावसाला सुरुवात झाली असताना शहरातील नाले गटारी व्यवस्थित साफ झालेल्या नाहीत अनेक नाल्यांमध्ये गटारीमध्ये प्लास्टिक,अनेक खराब वस्तू कपडे,प्लास्टिकच्या बॉटल झाडांचा पालापाचोळा कचरा मोठ्या प्रमाणात साचलेले आहे.त्याची कुठेही स्वच्छता केलेली नाही त्यामुळे जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर हे नाले गटारी तुंबून त्यामधील पाणी शहरातील अनेक घरांमध्ये हे पुराचे पाणी घुसून नागरिकांचे मोठे नुकसान होऊ शकते.याला जबाबदार कोण असणार उद्या यामधून काही जीवित हानी झाल्यास त्याची जबाबदारी महापालिका आपल्या ढिसाळ अकार्यक्षम कामामुळे घेईल का ? अजूनही वेळ गेलेली नाही.मनपा आयुक्त नाशिक महानगरपालिका व अधिकाऱ्यांच्या या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करण्याची वेळ येऊ नये. यासाठी वरील गोष्टींना प्राधान्य देणे गरजेचे आहे परंतु ते दिले जात नाहीत तसेच शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांट्या वाढलेल्या आहेत अनेक मोठमोठे वृक्ष अस्ताव्यस्त वाढलेले असताना त्यांची कुठेही छाटणी झालेली दिसत नाही त्याचबरोबर विद्युत तारा अनेक ठिकाणी लोमकाळलेल्या अवस्थेत दिसत आहेत.अनेक ठिकाणी विद्युत तारेचे पोल पडायला झालेले आहेत परंतु त्याची कुठेही दुरुस्ती झालेली नाही उद्या वादळी वारा पाऊस आल्यानंतर यातून जर काही मोठी हानी झाली तर याला जबाबदार कोण राहणार महापालिका प्रशासनाने तात्काळ या सर्व वरील मागण्यांच्या बाबत शहरातील सर्वे करून तसेच मनपायुक्त यांनी स्वतः विभाग वाईज अधिकाऱ्यांना सूचना देऊन तात्काळ वरील सर्व कामे मार्गी लावावी अन्यथा छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने नाशिक महानगरपालिकेच्या समोर आम्हाला महापालिका व शासनाच्या विरोधात मोठे जन आंदोलन करावे लागेल. व या सर्वस्वी जबाबदार नाशिक महानगरपालिका असेल याची नोंद घ्यावी. यावेळी निवेदन देताना संस्थापक अध्यक्ष करण गायकर,युवा प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग,युवक प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे,नाशिक जिल्हाप्रमुख आशिष नाना हिरे,प्रदेश उपाध्यक्ष सुभाष गायकर, आयटी राज्य संपर्कप्रमुख वैभव दळवी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष महिला आघाडी संगीता ताई सूर्यवंशी,उत्तर महाराष्ट्र कामगार आघाडी अध्यक्ष दिनेश नरवडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सविताताई वाघ,जिल्हा संघटक राहुल काकळीज, युवा शहर संघटक जयेश मोरे.आदी पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS