Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आध्यात्मिक स्थान सर्वांना प्रकाश देणारे ठरेल – ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी

वणी गावात ब्रह्माकुमारी संस्थेचे नवनिर्मित वास्तू मध्ये गृह प्रवेश व कलश पूजन

नाशिक/ वणी - आपण सर्व एक निराकार कल्याणकारी शिव परमात्म्याची संतान आहोत त्यामुळे आपले तर कल्याण होणारच आहे मात्र सोबतच सर्व वणीकरांसाठी सुद्धा हे

पंकजांचा धनुभाऊंवर हल्लाबोल | LOKNews24
पदोन्नतीतील आरक्षणाबाबत राज्य सरकारची दिरंगाई
खासदार लंके यांचे निवडणूक निधी देणार्‍यांसाठीच आंदोलन ?

नाशिक/ वणी – आपण सर्व एक निराकार कल्याणकारी शिव परमात्म्याची संतान आहोत त्यामुळे आपले तर कल्याण होणारच आहे मात्र सोबतच सर्व वणीकरांसाठी सुद्धा हे स्थान अतिशय कल्याणकारी सिद्ध होणार आहे. शिव भगवंताचे घर हेच आपले सुद्धा घर असे समजून तुम्ही सर्व या ठिकाणी येऊन आध्यात्मिक उन्नती करा. भगवंताला सर्वजण मानतात परंतु भगवंताला जाणणे व त्याचा परिचय प्राप्त करून घेणे प्रत्येकाच्या जीवनासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. भगवंताचा खरा परिचय प्राप्त करून देण्याचे हे आध्यात्मिक स्थान सर्वांना प्रकाश देणारे ठरेल असे प्रतिपादन राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी केले 

दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी कसबे वणी या ठिकाणी ब्रह्माकुमारी संस्थेचे नवनिर्मित वास्तू मध्ये गृह प्रवेश व  कलश पूजन नाशिक जिल्हा प्रमुख ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे वरिष्ठ राजयोगी ब्रह्माकुमार माधव भाई पंचवटी सेंटरच्या ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी वरिष्ठ राजयोग शिक्षक ब्रह्माकुमार नरेंद्र भाई आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

 आज कलियुगी दुनियेत सर्वजण दुखी अशांत व त्रस्त आहेत घराघरात खूप समस्या आहेत यातून शारीरिक व मानसिक आजार मोठ्या प्रमाणात उद्भवलेले आहेत यातून मुक्ती मिळवण्याचा एकमेव रस्ता म्हणजे ब्रह्माकुमारी संस्थेचे राजयोग मेडिटेशन होय या राजयोग सेवा केंद्रातून सर्वांना हाच संदेश देण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही दीदींनी याप्रसंगी सांगितले.

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असे हे प्रसिद्ध वनी देवी चे तीर्थस्थान भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र आहे या तीर्थस्थानावर ब्रह्माकुमारी संस्थेचे हे नवनिर्मित अध्यात्मिक केंद्र सर्वांना ज्ञानप्रकाशाने उजळून टाकेल व येथून सर्वांना सुख शांतीचा मार्ग प्राप्त होईल असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी पुष्पादीदी यांनी केले.

आपण सर्व भगवंताची भाग्यवान लेकरे आहोत.  या स्थानावर भगवंताचे शिक्षण घेऊन आपण मनुष्य पासून देवता बनणार आहोत.  21 जन्मा पर्यंत आपल्याला सुख शांती प्राप्त होणार आहे.   या सेवा केंद्रातून सर्वांना नक्कीच आदर्श जीवनाचे शिक्षण मिळेल असे भाव ब्रह्माकुमार माधव भाई यांनी व्यक्त केले.

वनी सारख्या तीर्थक्षेत्रावर शिव भगवंताचे परिचय देण्याचे स्थान निर्माण झालेले आहे भगवंत आपल्या भक्ताची इच्छा जरूर पूर्ण करतात या स्थानावरून भगवंत सर्वांची मनोकामना अवश्य पुरी करतील या केंद्रामध्ये येऊन अध्यात्मिक ज्ञानाचा सर्वांनी पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन ब्रह्माकुमार नरेंद्र भाई यांनी केले

बिल्डर आनंद सिसोदिया, पत्रकार पाटोळे सर, ब्रह्माकुमर देवेंद्र जाधव आदी प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा याप्रसंगी उपस्थित होते

वनी येथील राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारी अनिता दीदी यांनी आभार व्यक्त केले तर सूत्रसंचालन ब्रह्माकुमार दिलीप भाई यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक व  साधक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रम प्रसंगी वणी जगदंबा देवी मंदिराचे सुधीर दवणे गुरुजी यांच्या हस्ते कलश पूजन करून धार्मिक विधी द्वारे गृहप्रवेश करण्यात आला.

COMMENTS