Homeताज्या बातम्यादेश

पुद्दुचेरीमधून एक धक्कादायक घटना समोर

पुत्रप्रेमापाेटी आईनं केला मुलाच्या मित्राचा खून

नवी दिल्ली प्रतिनिधी -  पुद्दुचेरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईसाठी आपलं मूल जितकं प्रिय असतं तितकंच दुसऱ्याचं मूलही असतं, पण पुडु

पिता-पुत्राचा शॉक लागून मृत्यू
एसटी डेपो मंजूर करता आला नाही त्यांचे एमआयडीसीचे आश्‍वासन
रोटरी क्लबतर्फे करणार कमर्शिअल चक्की वाटप

नवी दिल्ली प्रतिनिधी –  पुद्दुचेरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईसाठी आपलं मूल जितकं प्रिय असतं तितकंच दुसऱ्याचं मूलही असतं, पण पुडुचेरीच्या कराईकल मध्ये वर्गात एक मुलगा आपल्या मुलाच्या पुढे गेल्याचं एका आईला इतकं वाईट वाटलं की तिने त्या १३ वर्षाच्या निष्पाप मुलाला विष पाजून त्याचा  जीव घेतला. बाला मणिगंदन असं या मुलाच नाव आहे. या मुलाला शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र, त्याला वाचवण्यात अपयश आले. मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वर्गमित्राच्या  आईला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

COMMENTS