हिंगोली प्रतिनिधी - नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. यातच आता हिंगोली जिल्ह

हिंगोली प्रतिनिधी – नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. यातच आता हिंगोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांच्या नावे असलेले 70 हजारांचे कर्ज कसे फिटेल या चिंतेत असल्याने एका तरुणाने आत्महत्या केली. स्वतःच भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून तरुणाने गळफास घेत आपले जीवन संपविले सेनगाव तालुक्यातील कारेगाव शिवारात काल रविवारी ही घटना उघडकीस आली. नवल जयराम नायकवाल (वय 28) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
COMMENTS