Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरे गटाला धक्का

युवतीसेनेच्या 35 पदाधिकार्‍यांचे राजीनामे

पुणे प्रतिनिधी- बंड केल्यानंतर ठाकरेगटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं उघड आहे.उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर आरोप करत अनेक बड्या नेत्य

मोदी म्हणजे भेकड पक्षाचे नेते- उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले; उध्दव ठाकरे यांचा आरोप
ठाकरे गटाला पुन्हा धक्का

पुणे प्रतिनिधी– बंड केल्यानंतर ठाकरेगटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं उघड आहे.उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर आरोप करत अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला.त्यातच आता पुण्यातील युवतीसेनेच्या 35 पदाधिकार्‍यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. युवती सेना सहसचिव शर्मिला येवलेंनी समर्थकांसह युवती सेना पदाचा राजीनामा दिला. पक्षातील वरिष्ठ पदाधिकार्‍यांकडून काम करू दिले जात नाही आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या. एक कार्यकर्ते म्हणून आम्ही पुढील काळात काम करू असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
मागच्या काही दिवसात पक्षात जे सुरु आहे. त्यावर युवती सेनेच्या पदाधिकारी नाराज आहेत. अडचणीच्या काळात पक्ष सोडणे योग्या नाही पण पदाधिकारी राजीनामा देण्यावर ठाम आहेत. 35 पदाधिकारी युवतीसेना पदाचा राजीनामा देत आहोत, असे शर्मिला येवले यांनी यावेळी सांगितले. युवती सेनेच्या पदाधिकार्‍यांना वरुण सरदेसाईंचा फोन आला होता. त्यांनी फोन करून मुंबईत भेटीसाठी बोलावले आहे. युवती सेनेच्या पदाधिकारी मुंबईत बैठकीला जाणार आहेत. मात्र आम्ही राजीनामा देण्यावर ठाम असल्याचे शर्मिला येवले यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातूनही पदाधिकारी राजीनामा देणार आहे. शहर, तालुका, जिल्हा स्तरावर काम करणार्‍या तरूणी नाराज आहेत. तरूणी, महिला यांचा राजकारणातील वावर कमी आहे. सध्या ग्रामीण भागातही तरूणी पुढे येत आहेत. राजकारणात सक्रीय होत आहेत. ही चांगली आहे. पण नेतृत्व करताना स्थानिक पातळीवरील महिला-तरूणींना होणार त्रास लक्षात घेतला पाहिजे. पक्षातील वरिष्ठ नेते याची दखल घेत नाहीत. त्यामुळे युवा नेत्यांमध्ये नाराजी आहे, असं म्हणत शर्मिला यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. 

COMMENTS