Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हॉटेलमधे मारहाण करणार्‍या चौघांवर गंभीर गुन्हा दाखल

संगमनेर/प्रतिनिधी : हॉटेल बंद झाल्यानंतर जेवण मागितले, मात्र हॉटेल मालकाने जेवण दिले नाही या कारणावरून हॉटेल मालक, त्यांचा मुलगा, वॉचमन यांना मार

राज ठाकरेंनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे : शरद पवार l DAINIK LOKMNTHAN
धनगर समाजाच्या उपोषणाची सरकारकडून दखल
ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये झपाट्याने वाढ | पहा Lok News24

संगमनेर/प्रतिनिधी : हॉटेल बंद झाल्यानंतर जेवण मागितले, मात्र हॉटेल मालकाने जेवण दिले नाही या कारणावरून हॉटेल मालक, त्यांचा मुलगा, वॉचमन यांना मारहाण करून हॉटेलमध्ये गोंधळ घालत खुर्च्यांची फेकाफेक करीत हॉटेल मालकाची सोन्याची चैन आणि रोख रक्कम लंपास करणार्‍या चौघा जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश सूर्यवंशी, सम्राट हासे, विकास डमाळे डमाळे व दीपक रणसुरे (पूर्ण नाव पत्ते माहित नाही सर्व रा. संगमनेर) अशी चौघा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या चौघा जणांविरोधात हॉटेल व्यवसायिक अंकुश सुरेश अभंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान संहिता कलम 394, 452, 427, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर-अकोले रस्त्यावरील हॉटेल सेलिब्रेशन मध्ये सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गेल्या दोन दिवसापासून या घटनेची घटनेची चर्चा संगमनेरात सुरू होती. यावेळी घटनास्थळी पोलीस देखील उपस्थित असताना पोलिसांसमोर हा प्रकार घडला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री आठ वाजता पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. हॉटेल मालक सुरेश अभंग यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी रात्री हॉटेल बंद करण्याच्या वेळी हॉटेलमध्ये असलेल्या कॅफे सेक्शनमध्ये एक महिला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास येऊन बसली. तिने थोड्या वेळाने फोन केल्यानंतर हॉटेलच्या गेटवर एक जण आला. मात्र हॉटेलचे गेट बंद असल्याने वॉचमनने त्याला हॉटेल बंद झाल्याचे सांगितले. मात्र वॉचमनशी वाद घालत तो तरुण हॉटेलमधील कॅफे सेक्शन मध्ये बसलेल्या त्या महिलेसोबत जाऊन बसला जाऊन बसला तसेच जेवणाची ऑर्डर देऊ लागला.
मात्र हॉटेल बंद झाले असल्याचे नम्रपणे त्याला सांगण्यात आले. यादरम्यान त्याने फोन करून योगेश सूर्यवंशी, दीपक रणसुरे आणि विकास डमाळे यांना हॉटेलवर बोलावून घेतले. पाचच मिनिटात आलेल्या सर्वांनी मला व माझ्या मुलाला शिवीगाळ करून दमदाटी करण्यास सुरुवात केली. आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता या सर्वांनी मिळून काही ऐकून न घेता योगेश सूर्यवंशी यांनी माझ्या कानाखाली जोराने मारले व लाथाबुक्क्याने मारहाण केली. सूर्यवंशी याने गळ्यातील दीड तोळे वजनाची चैन काढून घेतली तसेच मुलगा वेदांत अभंग याला या सर्वांनी मिळून मारहाण करीत फरफटत ओढत नेले. व त्याच्या पॅन्टच्या खिशातील तीस हजार सातशे रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. आरोपींना प्रतिबंध केला असता त्यांनी हॉटेलमधील प्लास्टिकच्या खुर्च्या व भांडे उचलून अंगावर फेकून मारहाण केली. तसेच सर्विस बॉय वेटर यांना दुसर्‍या दिवशी पुन्हा येऊन मारहाण करण्याची धमकी दिली, असे अभंग यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार हे करीत आहेत.

COMMENTS