Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोशल मीडियावरील तक्रारीसाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू करावी

कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे नारायण आग्रवाल यांची मागणी

कोपरगाव प्रतिनिधी- वाढता सोशल मीडियाचा वापर लक्ष्यात घेता त्यावर येणार्‍या सूचना वजा तक्रारींचे निवारण करण्यासाठी शासनाने स्वतंत्र यंत्रणा सुरू क

नरेंद्राचार्य महाराजांनी भक्तीचा सन्मार्ग दाखविला ः पुष्पाताई काळे
मागासवर्गीय व्यक्ती न्याय हक्कापासून वंचित..अपिलीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, अहमदनगर यांचे कामकाज l LokNews24
एस. एस. जी. एम. महाविद्यालयात होणार गुणवंतांचा सत्कार

कोपरगाव प्रतिनिधी- वाढता सोशल मीडियाचा वापर लक्ष्यात घेता त्यावर येणार्‍या सूचना वजा तक्रारींचे निवारण करण्यासाठी शासनाने स्वतंत्र यंत्रणा सुरू करण्याची गरज असल्याचे मत कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे नारायण आग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.
या विषयी आग्रवाल यांनी म्हटले आहे की, सध्या आपण दररोजच शेकडो सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या साईटवर वेगवेगळे मेसेज वाचतो तो आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भागच झाला आहे. सोशल मीडिया मधील फेसबुक व्हाट्सअप आदी माध्यमातूनअनेक समाजपयोगी सूचना व तक्रारी रोजच असतात. अनेक तक्रारी व सूचना खरोखर विचार करायला लावणार्‍या व सत्य असतात. पण प्रश्‍न पडतो,या सूचनांचा या तक्रारींचे पुढे काय होते,शासन दरबारी याची नोंद होते की नाही. याचा कोणालाही थांग पत्ता लागत नाही. या तक्रारीची शासन दरबारी कारवाई करता का उगीचच टाइमपास आहे. आणि म्हणूनच शासनाने अशा तक्रारी करता स्वतंत्र यंत्रणा सुरू करावी. सदर तक्रारी व सूचनांना योग्य तो प्रतिसाद दिला तर भविष्यात एक मोठे व्यासपीठ तयार होईल. सोशल मीडिया वरील तक्रारीना योग्य न्याय दिला तर प्रसंगी होणारे वाद-विवाद,अर्ज फाटे,मोर्चे,वगैरे गोष्टींना नक्कीच आळा बसेल.यातून जनतेची मन की बातशासनाला समजेल एक नवीन जनता भिमुख व शासन यात समन्वय होऊन बरेच प्रश्‍न समस्या निकाली निघतील व शासन दरबारी सुद्धा माहिती संपर्क एवढाच धाक या गोष्टीमुळे होईल यात शंका नाही तरी शासनाने सोशल मीडिया वर येणार्‍या हजारो तक्रारी लक्ष्यात घेऊन त्यातील महत्वाच्या बाबीचा विचार करत मार्ग काढावा यामुळे नक्कीच जनतेला काय हवे आहे हे शासनाला समजेल यात अनेक भागातील नागरिकांच्या अनेक छोट्या मोठ्या समस्या अगदी पोटतिडकीने मांडलेल्या असतात या सर्वांची शहनिशा करत त्याचे निरसन करत गेले तर त्यातून नक्कीच  विकासाला योग्य दिशा मिळेल असे मत आग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS