Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे उष्माघाताच्या रुग्णांसाठी एक स्वतंत्र स्थापन

ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने
गुलाबराव आपलं Love marriage नव्हे Arranged marriage
छत्रपती संभाजीनगरमध्ये समाजसेवकाला महिलांकडून बेदम मारहाण
औरंगाबाद प्रतिनिधी ः शहराचे तापमान सोमवारी 40 अंशापर्यंत पोहोचले तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत उष्माघाताचा धोका अधिक असतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे हाच एकमेव मोठा उपाय आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने चिकलठाण्यातील मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे उष्माघाताच्या रुग्णांसाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. शनिवारी एका आशा वर्करवर उपचार करण्यात आले. ’उष्माघातामुळे रुग्णाचा जीवसुद्धा जाऊ शकतो. सकाळी 9 वाजेनंतर ऊन चांगलेच तापायला सुरुवात होते. वेगवेगळ्या कामांसाठी नागरिक घराबाहेर पडतात. उन्हापासून बचाव करणारे कापड़ डोक्याला बांधलेले नसते. अनेक जण पाण्याची बाटली सोबत ठेवत नाहीत. महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार नागरिकांनी आपली कामे शक्य असेल, तर सकाळी किंवा संध्याकाळी करावीत, घराबाहेर पडायचे असेल, तर डोक्याला रुमाल, महिलांनी स्कार्फ बांधवा; अन्यथा छत्रीचा वापर करावा. गरजेप्रमाणे थोडे-थोडे पाणी पीत राहावे. दररोज 8 ते 10 ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यावे. नारळपाणी, ताज्या भाज्या, फळं खावीत आणि उन्हात बाहेर पडणे टाळावे.

COMMENTS