Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कामा रुग्णालयामध्ये बहरणार दुसरे मियावाकी जंगल

मुंबई : मुंबईमधील खालावणारी हवेची गुणवत्ता आणि वाढते प्रदूषण याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्

मेडिकल कॉलेजची टेंडर प्रक्रिया महिनाअखेर होणार
अखेर कोविशिल्डला ब्रिटनची मान्यता
श्रीं च्या पादुकासह प्रतिमेची ग्रामप्रदक्षणा

मुंबई : मुंबईमधील खालावणारी हवेची गुणवत्ता आणि वाढते प्रदूषण याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. मुंबईमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक तेवढे वृक्षारोपण करण्यात येत नाही. मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारच्या कामा रुग्णालयामध्ये दुसरे मियावाकी वन फुलविण्यात येत आहे. कामा रुग्णालयाच्या आवारातील तब्बल 7 हजार चौरस फूट जागेवर मियावाकी वन उभे राहात असून, त्यामध्ये विविध 45 प्रकारची 1500 झाडे लावण्यात येत आहेत.
विकासाच्या नावाखाली मुंबईमध्ये होत असलेल्या बांधकामांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. परिणामी, मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने उपाययोजन करण्याबरोबरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. मात्र प्रदूषण रोखण्यामध्ये वृक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कामा रुग्णालयामध्ये दुसरे मियावाकी वन उभारण्यात येत आहे. हे मियावाकी वन ग्लेनमार्क फाऊंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. या वनामध्ये अडुळसा, आवळा, दालचिनी, हिरडा, बदाम, फणस, कडीपत्ता, आंबा, कोकम, नागचाफा, करवंद, पिंपळ, शमी, सीता अशोक, सोनचाफा, सुपारी, तेजपत्ता, वड, रिठा, पारिजात, निरगुंडी आदी 45 प्रजातींची 1500 देशी आणि आयुर्वेदिक गुण असलेली झाडे लावण्यात येत आहेत. हे वन 7 हजार स्क्वेअर फूट जागेवर उभारण्यात येत आहे. या मियावाकी वनाची काळजी घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून माळ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वनातील झाडांची निगा राखणे, त्यांना खते घालणे याचप्रमाणे झाडांना दिवसांतून दोन वेळा पाणी घालण्यात येत आहे. झाडांना योग्य पाणीपुरवठ्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. मियावाकी उद्यानात झाडांना घालणार्‍या पाण्यांचे बाष्पीभवन होऊ नये यासाठी झाडांभोवती प्लास्टिकचे आवरण घालण्यात आले आहे. या उद्यानाच्या देखभालीसाठी संस्थेकडून योग्य मार्गदर्शन करण्यात येत असून, ते झाडांच्या जोपासनेवर लक्ष ठेवणार आहेत, अशी माहिती कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.

COMMENTS