Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येणार्‍या कुठल्याही निवडणुकीत घरचा उमेदवार देणार नाही-आ.संदीप क्षीरसागर

बीड प्रतिनिधी - निवडणूक आयोग सुद्धा आमच्यावर मेहरबान असून रोज सकाळी शेतात जाण्याआधी शेतकर्याच्या हातात कपबशी असते त्याचप्रमाणे शेतकरी परिवर्तन म

पवार साहेबांच्या सभेतून मिळणार महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा- संदीप क्षीरसागर
पेठ बीड भागाचा पाण्याचा दुष्काळ संपणार !
अवर्षणग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ मदत करा

बीड प्रतिनिधी – निवडणूक आयोग सुद्धा आमच्यावर मेहरबान असून रोज सकाळी शेतात जाण्याआधी शेतकर्याच्या हातात कपबशी असते त्याचप्रमाणे शेतकरी परिवर्तन महाआघाडीचे उमेदवार वर्षानुवर्ष आपल्या सेवेत राहून कपबशी प्रमाणे आपल्या हातात राहतील. छत्रीचा उपयोग फक्त पावसाळ्यात सिजन पुरताच असतो नंतर छत्रीला फेकून दिले जाते. याचप्रमाणे प्रस्थापिताचे 40 वर्षाची सत्ता फेकून देण्याचे काम आपल्याला या निवडणुकीत करायची आहे. भविष्यात येणार्या कुठल्याही निवडणुकीत माझा घरचा उमेदवार उभा राहणार नाही असे वक्तव्य आ.संदीप क्षीरसागर यांनी कामखेड पंचायत समिती गणाच्या पारगाव सिरस येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या प्रमुखांनी झंझावती दौरे सुरू केले असून या अनुषंगाने कामखेडा पंचायत समिती गणाची बैठक पारगाव सिरस येथे संपन्न झाली. याप्रसंगी आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आ.सय्यद सलीम, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, काँग्रेसचे नेते रवींद्र दळवी,ज्येष्ठ नेत्या सुशीलाताई मोराळे, सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे, ज्येष्ठ नेते बबनराव गवते, वैजनाथ तांदळे, सुनिल अनभुले, राजुरी सर्कलमधील उमेदवार बळी जिजा चव्हाण, उमेदवार सौ.सुभद्राताई माने, सचिन शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आ.माजी सय्यद सलीम म्हणाले की, कपबशी काय असते हे प्रस्थापितांना माहित असून विधानसभेच्या निवडणुकीत माजी निशाणी सुद्धा कपबशी होती. शेतकर्यांच्या हातात असलेली कपबशी उमेदवाराच्या रूपाने आपल्या दारात उभी आहे म्हणून शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे. याप्रसंगी बोलताना अनिल दादा जगताप म्हणाले की, प्रस्थापितांना कात्रजचा घाट दाखवायचा असून याकरिता यापुढे प्रत्येक निवडणूक आम्ही याप्रमाणेच आघाडी करून लढणार आहोत. सावता परिषदेचे कल्याण आखाडे म्हणाले की, महाराष्ट्रभर सावता परिषद महाविकास आघाडीच्या पाठीशी असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदार संघातील सावता परिषदेचे कार्यकर्ते सज्ज झाले असून या निवडणुकीत प्रस्थापितांची सत्ता उध्वस्त करतील. या बैठकीस कामखेडा पंचायत समिती गणातील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन यांच्यासह पारगाव सिरस येथील ग्रामस्थ शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS