Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ.संदीप क्षीरसागरांच्या सोडला रहदारीचा प्रश्न !

नगरपालिका,पोलीस प्रशासन व फळ विक्रेते यांच्यात मध्यस्थी करत काढला मार्ग

बीड प्रतिनिधी - शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात, तेल गल्ली, कंकालेश्वर मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर फळविक्रेते बागवान समाजाचे

Beed : बनावट दारूच्या गोदामावर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त (Video)
बाळासाहेब ठाकरे यांच्या कुलाब्यातील पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते इंडसइंड बँकेच्या शाखेचा शुभारंभ

बीड प्रतिनिधी – शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात, तेल गल्ली, कंकालेश्वर मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर फळविक्रेते बागवान समाजाचे गाडे असतात. या गाड्यांमुळे नेहमी रहदारीस अडचण होते. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी पुढाकार घेऊन नगरपालिका, पोलीस प्रशासन व फळ विक्रेते यांच्यात मध्यस्थी केली. गाडे रस्त्याच्या मागे लावणे, असा मार्ग काढण्यात आला.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर व इतर ठिकाणच्या रस्त्यावर रहदारीची अडचण होत असल्यामुळे फळ विक्रेते यांचे गाडे पोलीस प्रशासनाकडून जप्त करण्यात आले होते. त्यामुळे सर्व बागवान समाजाने गुरूवार दि.15 जून 2023 रोजी सकाळी आ.संदीप क्षीरसागर यांचे भेट घेतली होती. यावर आ.संदीप क्षीरसागर यांनी झालेला प्रकार व नागरिकांना होत असलेली रहदारीची अडचण लक्षात घेवून लगेचच पोलीस प्रशासन, नगर पालिका व फळ विक्रेते यांच्यासोबत एकत्रित बैठक करून मध्यस्थी करत फळ विक्रेते बागवान यांनी आपआपले गाडे रस्त्याच्या पाठीमागे जबाबदारीने लावावे जेणेकरून रहदारीची अडचण निर्माण होणार नाही ही सूचना सर्व फळविक्रेत्यांनी मान्य केली. शहरातील या भागात असलेल्या वाहतुक कोंडीचा महत्त्वाचा प्रश्न यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांच्या मध्यस्थीने सुटला आहे. या झालेल्या मध्यस्थीचा फायदा नागरिक,फळ विक्रेते यांना ही होणार आहे.
रस्ता व नाली कामाची पाहणी
शहरातील सुभाष रोड व सांगली बँकेच्या पाठीमागील अक्षय कॉलनी येथील रस्ता व नालीच्या अडचणीची प्रत्यक्ष पाहणी दि.15 जून रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली. यावेळी नगर पालिका अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

COMMENTS