Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडचिरोलीत धावत्या बसने पेट घेतला

नागपूर ः भंगार बसेसमुळे राज्यभरात चर्चेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारावर पुन्हा एकदा प्रश्‍न उपस्थित झाले आहे. शुक्रवारी सकाळ

वडगाव गुप्ता ग्रामस्थांनी केले सीना नदीचे जलपूजन
दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गावठी कट्ट्यासह पकडली
नवरात्र उत्सवात केडगाव देवीच्या मंदिर परिसरात स्टॉल लावण्यास परवानगी द्यावी

नागपूर ः भंगार बसेसमुळे राज्यभरात चर्चेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारावर पुन्हा एकदा प्रश्‍न उपस्थित झाले आहे. शुक्रवारी सकाळी मुलचेरा-घोट मार्गावर धावत्या बसने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. पण बस चालक व वाहकाने प्रसंगावधान दाखवत जंगलातच बस थांबवून प्रवाशांना तत्काळ खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील गडचिरोली आणि अहेरी आगार भंगार बसेसमुळे कायम चर्चेत आहे.

COMMENTS