अहमदनगर - विचार भारती,अहिल्यानगर व उत्कर्ष फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सव च्या वतीने पुण्यश्लोक अहि

अहमदनगर – विचार भारती,अहिल्यानगर व उत्कर्ष फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सव च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त नगरमध्ये सावेडीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेची प्रारंभ श्रीराम चौक चौक येथूनसुरु होऊन पाईपलाईन रोड,भिस्तबाग चौक, कुष्ठधाम रोड,प्रोफेसर कॉलनी चौक येथे सांगता झाली,मिरवणुकीत डॉ.अशोक भोजने,अध्यक्ष, उत्कर्ष फौडेशन,माजी महापौर बाबासाहेब वाकळे,कार्याध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सव,अरूण कुलकर्णी,अध्यक्ष,विचार भारती,प्रसिद्धचित्रपट निर्माते बलभीम पठारे,निमंत्रक,सांस्कृतिक महोत्सव,सुधीर लांडगे सह निमंत्रक,प्रसाद सुवर्णपाठकी,सह निमंत्रक,अनिल मोहिते,इंजि.राजेंद्र तागड, राजाभाऊ मुळे,नगरसेवक संपत बारस्कर, डॉ सागर बोरुडे,शारदा ढवण,दीपाली बारस्कर,स्वप्नील ढवण,सत्यजित ढवण आदींसह समितीचे सदस्य,महिला व पुरुष नगरकर मोठ्या संख्नेने सहभागी झाले होते
मिरवणुकीत रथावर अहिल्याबाई होळकरांचा सजीव देखावा होता तर दुसऱ्या रथात त्याचा पुतळा होता मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले होते महाराष्ट्रातील लोककलावंत,धनगरी ढोलपथक,आदिवासी होळी नृत्य,आदिवासी कांबड नृत्य,आदिवासी गौरी नृत्य,आदिवासी टिपरी नृत्य,आदिवासी फुगडी नृत्य इ.प्रकार कलाकारानी आपली कला मिरवणुकीत सादर केली प्रोफेसर चौकात मिरवणुकीची सांगता झाली
COMMENTS