Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वरिष्ठांना खोटी माहिती पुरवतो म्हणून पोलिसाला पोलिसांची मारहाण

अहमदनगर प्रतिनिधी - वरिष्ठांना खोटी माहिती देतो म्हणून रेल्वे पोलिसाला (लोहमार्ग पोलिस) तीन पोलिसांनी बेदम मारहाण केली. रेल्वे पोलिस कॉन्स्टेबल

अपूर्वा रोकडेची ज्युनियर कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी
सरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १ वर्षाची मुदतवाढ : ग्रामविकास मंत्री मुश्रीफ
राजकीय संघर्षात कुसडगाव एसआरपीएफ केंद्राचे लोकार्पण

अहमदनगर प्रतिनिधी – वरिष्ठांना खोटी माहिती देतो म्हणून रेल्वे पोलिसाला (लोहमार्ग पोलिस) तीन पोलिसांनी बेदम मारहाण केली. रेल्वे पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र देशमुख यास पोलिस हवालदार मनोज साळवे, पोलीस नाईक हर्षल तोरणे व पोलिस कॉन्स्टेबल जगताप यांनी, तू येथे येऊन माजलास काय? असे म्हणत लाथाबुक्क्यांनी व लाकडांनी मारहाण केल्याची घटना अहमदनगर रेल्वे स्टेशन पोलिस चौकीत घडली.


याबाबत माहिती अशी की, पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र देशमुख हे लोहमार्ग पोलिस ठाणे अहमदनगर येथे सुमारे एक महिन्यापासून नेमणुकीस आहे. दि. 6 रोजी त्यांना रात्री नऊ ते दि. 7 रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत स्टेशन ड्युटी होती. त्यांच्यासोबत पोलिस कॉन्स्टेबल जगताप होते. तसेच पोलिस ठाणे अमलदार ड्युटीस पोलिस हवालदार मनोज साळवे व चालक ड्युटीस पोलिस नाईक हर्षल तोरणे होते. रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास देखमुख पोलिस ठाण्यात असताना कॉन्स्टेबल जगताप याने काहीएक कारण नसताना देशमुख यांना, तू इथे येऊन माजलास का? असे म्हणून शिवीगाळ केली. त्यामुळे देशमुख हे त्यांच्या ड्युटीसाठी बाहेर निघाले. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे कॉन्स्टेबल जगताप हातात लाकडी दांडके घेऊन तसेच हवालदार साळवे व बाहेर खासगी ड्रेसवर ासलेला पोलिस नाईक तोरणे हे आले व तू आमच्या विरोधात वरिष्ठांना खोटी माहिती का देतो, असे म्हणून जगताप याने हातातील लाकडी दांडक्याने देशमुख यांच्या हाता-पायावर मारहाण केली व साळवे आणि तोरणे यांनी त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्याने मारहाण केली व शिवीगाळ करुन तू आमच्याविरुध्द तक्रार दिली तर तुझ्याविरुध्द अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करु, असे म्हणून तेथून निघून गेले.


या मारहाणीत देशमुख यांच्या डाव्या हाताच्या बोटांना जखम होऊन रक्त आले व उजव्या हाताचे मनगट मोडले आहे. मारहाण होताना देशमुख त्यांच्या जवळील मोबाईलमध्ये शूटींग काढत असताना त्यांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेऊन जमिनीवर आदळला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी लोहमार्ग पोलिस कॉन्स्टेबल रवीद्र भानुदास देशमुख (रा. सारसनगर, भगवानबाबा मंदिराजवळ, एकदंत कॉलनी, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलिस हवालदार मनोज साळवे, पोलिस नाईक हर्षल तोरणे ल पोलिस कॉन्स्टेबल जगताप यांच्याविरुध्द गुन्ह्याची नोंद केली आहे.

COMMENTS