ईडीच्या माध्यमातून विरोधकांना संपविण्याचा डाव

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ईडीच्या माध्यमातून विरोधकांना संपविण्याचा डाव

माजी मंत्री अनिल देशमुख यांचा भाजपवर आरोप

यवतमाळ प्रतिनिधी - ज्यात राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही. त्या ठिकाणी ईडीच्या माध्यमातून विरोधकांना संपविण्याचा डाव आखल्या जात आहे, असा

काँग्रेसच्या गतवैभवासाठी कामाला लागा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन
वालवडमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
जयहिंद लोकचळवळ व कर्‍हेश्‍वर विद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण

यवतमाळ प्रतिनिधी – ज्यात राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही. त्या ठिकाणी ईडीच्या माध्यमातून विरोधकांना संपविण्याचा डाव आखल्या जात आहे, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. यवतमाळ येथे सत्कार कार्यक्रमासाठी आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप हे सपशेल खोटे होते. ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप लावण्यात आले होते. काही राजकीय मंडळींना हाताशी धरून षडयंत्र रचण्यात आले. त्या आरोपात काहीही तथ्य आढळून आले नाही. आरोप करणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक होते, यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याचेही माजी मंत्री देशमुख म्हणाले.

COMMENTS