जामखेड ः मोबाईल फोनवर शिवीगाळ करत जोरात बोलण्यावरून जवळा बोर्ले दरम्यान पठाडे वस्तीजवळ मारहाणीत हा खुन झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.या प

जामखेड ः मोबाईल फोनवर शिवीगाळ करत जोरात बोलण्यावरून जवळा बोर्ले दरम्यान पठाडे वस्तीजवळ मारहाणीत हा खुन झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी सुरेश बाबुराव पठाडे, आदित्य (उर्फ) गोपाल सुरेश पठाडे व एक आनोळखी सर्व रा. जवळा फटा, पठाडे वस्ती, जवळा. ता. जामखेड आशा तीन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनकडून मिळालेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील बोर्ले येथील मयत शिवाजी रामदास चव्हाण हा आपल्या नातेवाईका समवेत 13 डिसेंबर 2023 रोजी बोर्ले ते जवळा रोडवरील एका हॉटेलमध्ये गेला होता. यावेळी सायंकाळी 7:45 वा मयत शिवाजी चव्हाण हॉटेलच्या बाहेर कोणाशीतरी फोनवर मोठ्याने बोलत शिवीगाळ करत होता. त्या ठिकाणी आरोपी सुरेश बाबुराव पठाडे हा आला व शिविगाळ का करतो या कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची होऊन जोराचे भांडण लागले. या भांडणाची माहीती मयताचे वडील रामदास चव्हाण यांना समजताच ते आपल्या पत्नीसह तातडीने त्या ठिकाणी मोटारसायकलवर पोहचले. यावेळी सुरेश पठाडे हा त्याच्या हातातील गजाने व आदित्य (उर्फ) गोपाल सुरेश पठाडे व एक अनोळखी इसम अशा तिघेजण शिवाजीला मारहाण करत होते. यावेळी शिवाजीचे नातेवाईक लक्ष्मण सुखदेव मते रा. मतेवाडी, फीर्यादीचा पुतण्या निलेश अभिमान चव्हाण तसेच मयताचे आई वडील हे देखील भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आरोपी हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते यावेळी आरोपी सुरेश पठाडे सह इतर आरोपींनी शिवाजीला गजाने व लाकडाने मारहाण केली व शिवीगाळ करून घटनास्थळाहुन निघुन गेले. या मारहाणीत शिवाजी रामदास चव्हाण यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव होत होता. नातेवाईकांनी तातडीने जामखेड येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र दि 14 डिसेंबर 2023 रोजी पहाटे 4 वाजता शिवाजी चव्हाण याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कर्जत उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत वाखारे, जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तातडीने जामखेड पोलीस स्टेशन चे पो.हे.कॉ संजय लोखंडे, पो.ना. अजय साठे, पो.ना अविनाश ढेरे, नवनाथ शेकडे, प्रविण पालवे, प्रकाश जाधव, यांनी तपास करीत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत.
COMMENTS