विजापूरहून आलेल्या रुग्णाचा कोरोनाने मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 विजापूरहून आलेल्या रुग्णाचा कोरोनाने मृत्यू

महापालिका प्रशासन अलर्ट

सोलापूर प्रतिनिधी - सोलापुरात उपचारासाठी आलेल्या जुना विडी घरकुल भागातील एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या मृत्यूमुळे महापालिकेचे आरोग्य प्रश

मालेगावमध्ये महापालिकेत काँगे्रसला खिंडार ; काँगे्रसच्या महापौरांसह 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश
विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पाऊस
एमआयडीसी वरील प्रश्नांवर मनसे आक्रमक 

सोलापूर प्रतिनिधी – सोलापुरात उपचारासाठी आलेल्या जुना विडी घरकुल भागातील एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या मृत्यूमुळे महापालिकेचे आरोग्य प्रशासन अलर्ट झाले आहे. त्या मृत व्यक्तीच्या संपर्कातील नातेवाईकांची तपासणी करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. कोरोनाने मृत पावलेली व्यक्ती ही 61 वर्षांची असून मागील चार ते पाच दिवसांपासून कर्नाटकातील विजयपूर येथून सोलापुरात आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्यास होती. त्या रुग्णाला टिबी तसेच दम्याचा त्रास असल्याचा देखील महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. 19 डिसेंबर रोजी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि 20 डिसेंबर रोजी त्या रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाने संबंधित मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचं सांगितल आहे. मृत रुग्ण हा विजापूरहुन आलेला असल्याने तो सोलापूरमध्ये कोणाच्याही संपर्कात आला नसल्याचे सोलापूर महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS