Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन गळा चिरुन हत्या

कल्याण : कल्याणमध्ये एका नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करून, तिची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. यामुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सं

म्हसवड शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत
भाजपला आता संघाची गरज नाही
विजेच्या धक्क्याने 3 जणांचा मृत्यू

कल्याण : कल्याणमध्ये एका नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करून, तिची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. यामुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी देखील अल्पवयीन आहे. मृत मुलगी आणि संशयित आरोपी दोघेही फिरस्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण रेल्वे स्थानक परिसरात गुरुवारी सकाळी एका नऊ वर्षांच्या मुलीचा गळा चिरलेल्या आणि विवस्त्र अवस्थेत असलेला मृतदेत आढळला होता. यावरुन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. स्थानिक नागरिकांनी याची माहिती ही महात्मा फुले पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथकांची स्थापना केली. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासले. दरम्यान तपासात ही मुलगी फिरस्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपासाचे धोरण ठेवत आरोपीचा शोध पोलिस घेत होते. त्यानुसार एका अल्पवयीन मुलावर पोलिसांना संशय आला असून त्यानेच या मुलीचा गळा चिरून हत्या केली असल्याचा संशय आहे. मृत पीडितेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. ऑक्टोबर महिन्यात कल्याण पश्‍चिमेत 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चॉकलेट देण्याचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. त्यानंतर ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

COMMENTS