Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

संगमनेरच्या सोनेवाडी येथील घटना; आरोपी अटकेत

संगमनेर/प्रतिनिधी ः नऊ वर्ष वयाच्या चिमुरडीवर संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी येथे सोमवारी रात्री अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. संगम

करमाळ्याचे आमदार यांनी शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर काढलेले कोट्यवधी कर्ज l पहा LokNews24
फराह खान आणि साजिद खानने घेतले साईसमधीचे दर्शन 
पढेगावला बिबट्याची मादी जेरबंद

संगमनेर/प्रतिनिधी ः नऊ वर्ष वयाच्या चिमुरडीवर संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी येथे सोमवारी रात्री अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर पोलिसांनी विकृत आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रमेश जयराम सांगळे (रा. सोनेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे विकृत आरोपीचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी येथे पीडित चिमूरडी आपल्या कुटुंबीयासमवेत एका विवाह समारंभासाठी आली होती. सोमवारी (दि. 15 मे) रात्री हळदीचा कार्यक्रम सुरू असताना पीडित चिमुरडी आपल्या आईसोबत तेथे उपस्थित होती. काही वेळानंतर पीडित चिमुरडी तेथून बाजूला गेले असता तिच्यावर लक्ष ठेवून असलेला रमेश सांगळे याने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिला अंधारात जवळच्या शेतामध्ये नेत तिच्यावर पाशवी अत्याचार केला. साधारणत: साडेदहा वाजण्याच्या सुमारास घाबरलेल्या अवस्थेत पीडित चिमुरडी आपल्या आईकडे आली असता आई आणि नातेवाईकांनी तिला विश्‍वासात घेत तिच्याकडे चौकशी केली. यावेळी तिने झालेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यामुळे मंगळवारी दुपारी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने आरोपी रमेश सांगळे याच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड विधान कलम 376 (अ, ब), 376 (2)(फ) सह बालकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा 2012 चे कलम 4, 8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करून तातडीने आरोपीला अटक केली. पोलिस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे स्वतः तपास करत आहे.

COMMENTS