Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरच्या बालगृहातून नऊ वर्षाच्या मुलाला पळविले

संगमनेर/प्रतिनिधी ः संगमनेरच्या बालगृहातून अज्ञात व्यक्तीने नऊ वर्षीय वयाच्या बालकाला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्यात

स्व. शंकरराव कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन
दरोडा टाकण्याच्या तयारीतील सशस्त्र टोळी जेरबंद
नगरमध्ये किराणा दुकानातून 18 हजाराच्या तांदळाची चोरी

संगमनेर/प्रतिनिधी ः संगमनेरच्या बालगृहातून अज्ञात व्यक्तीने नऊ वर्षीय वयाच्या बालकाला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्यात या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. संगमनेर शहरामध्ये बीएड कॉलेज जवळ बालगृह असून या बालगृहात असलेल्या नववर्षीय मुलाला काहीतरी फुस लावून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तक्रारदाराच्या रखवालीतून पळवून नेण्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी पाच ते सात वाजण्याच्या दरम्यान घडला. या संदर्भात बालगृहाचे कर्मचारी बाळकृष्ण दिगंबर आंबरे यांनी रविवारी दुपारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पटेल पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS