सरकारी मालकीच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने ब्राझीलच्या राष्ट्रीय तेल कंपनी असणाऱ्या पेट्रोब्रासशी इंधन तेल खरेदी करार केला
सरकारी मालकीच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने ब्राझीलच्या राष्ट्रीय तेल कंपनी असणाऱ्या पेट्रोब्रासशी इंधन तेल खरेदी करार केला आहे. यामुळे, लॅटिन अमेरिकेमधून कच्चे तेल मिळविणे या कराराने सोपे झाले आहे.मुंबई, मध्य प्रदेशातील बिना आणि केरळमधील कोची या भारतातील तीन रिफायनरी केंद्रात पेट्रोल आणि डिझेल सारख्या शुध्द केल्या जाणाऱ्या इंधनात रूपांतरित होणाऱ्या कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात आयात केली जाणार आहे.. इराक आणि सौदी अरेबिया सारख्या पश्चिम आशियाई राष्ट्रांकडून देखील याच कंपनीकडून कच्चे तेल आयात केले जाते.
असा पुरवठा पुरवठा करणारी ही फर्म, कोणत्याही विशिष्ट देशांकडूनच कच्च्या इंधन तेलाची आयात अथवा अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नात त्याच्या पुरवठ्याच्या स्त्रोतांमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करीत आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि पेट्रोब्रासचे सीईओ यांनी ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. बीपीसीएलने एका निवेदनात म्हटले आहे. सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याने दोन्ही कंपन्यांमधील भविष्यातील कच्च्या तेलाचे व्यापार संबंध अधिक दृढ होतील आणि दीर्घकालीन आधारावर, विशेषत: सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीचा विचार करून, बीपीसीएल द्वारे संभाव्य कच्च्या आयातीच्या संधींचा शोध घेतला जाईल,”
असे देखील या करारात म्हटले आहे. बीपीसीएल ची उप कंपनी असलेल्या ऑइल आणि गॅस एक्सप्लोरेशन आणि उत्पादन उपकंपनी, भारत पेट्रो रिसोर्सेस लिमिटेड (बीपीआरएल) या कंपनीने देखील ब्राझीलमध्ये ऑइल ब्लॉक विकसित करण्यासाठी १.६ अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. बीपीआरएल कडे ब्राझीलमधील अल्ट्रा-डीप वॉटर हायड्रोकार्बन ब्लॉकमध्ये भागभांडवल आहे, ज्यामुळे, बीपीआरएल या उपकंपनीला पेट्रोब्रासचे संचालनही करता येईल. आहे. क्षेत्र विकास आराखडा आणि अंतिम गुंतवणुकीचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे, असे निवेदनात दिलेल्या तपशीलात म्हटले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने कंपनीला ब्राझिलियन ऑइल ब्लॉक बीएम-सील-११ मध्ये अतिरिक्त १.६ अब्ज डॉलर गुंतवण्यास मंजुरी दिली.
ब्लॉकचे उत्पादन सन २०२६-२७ पासून सुरू होणार आहे. आता विकसित होत असलेल्या ब्लॉकमध्ये तेलाचे अनेक शोध लागले आहेत. मुळात, बीपीसीएलने २००८ मध्ये ब्लॉकमधील हिस्सा घेण्यासाठी व्हिडिओकॉनसोबत भागीदारी केली होती. आयबीव्ही ब्रासिल -, ११ व्हिडिओकॉन आणि बीपीआरएल व्हेंचर्स यांच्यातील समान म्हणजे ५०-५०% संयुक्त उपक्रम सुरू करता येईल., बीपीआरएल चे एक युनिट (बीपीसीएल चे अपस्ट्रीम शाखा),४० टक्के होते.पण व्हिडिओकॉनच्या दिवाळखोरीनंतर, बीपीआरएलकडे आता संपूर्ण ४०% हिस्सा आहे. भारताच्या इंधन तेलाच्या मुळ उत्पादनात पडणारी ही भर इंधन खर्च कमी करणार नसला तरी या उत्पादनांची भारतीयांची गरज मोठ्या प्रमाणात पूर्ण करणारी आहे. अर्थात, देशातल्या सार्वजनिक कंपन्याच्या माध्यमातून होणारे उत्पादन मोठ्याप्रमाणात असले तरी इंधनाची गरजपूर्तता मात्र, मात्र, आयातीतूनच पूर्ण केली जाते हे वास्तव. सध्या ब्राझील च्या कंपनीशी केलेला करार हा कच्च्या इंधनाचा असून या आयात मालाचे शुध्दीकरण भारतात तीन ठिकाणी होणार आहे.
COMMENTS