Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धुळे सोलापूर महामार्गावर चालत्या गाडीने घेतला पेट,जखमींना तात्काळ महामार्ग पोलिसांनी केली मदत!

मांजरसुंबा महामार्ग मदत पोलीस केंद्र तर्फे रंगीत तालीम

नेकनुर प्रतिनिधी - मांजरसुंबा महामार्ग पोलीस मदत केंद्र यांचे वतीने दिनांक 24/5/2023 रोजी औरंगाबाद सोलापूर महामार्ग वर मोटर वाहन अपघातातील जखमींन

सुप्रिया सुळेंनी घेतली सुनेत्रा पवार यांची गळाभेट
Solapur : .अन्यथा सहकार मंत्र्याची गाडी फोडणार (Video)
अप्रतिम वक्ते म्हणजे माझे ज्ञानोबा राय आहेत – अर्जुन महाराज लाड गुरुजी

नेकनुर प्रतिनिधी – मांजरसुंबा महामार्ग पोलीस मदत केंद्र यांचे वतीने दिनांक 24/5/2023 रोजी औरंगाबाद सोलापूर महामार्ग वर मोटर वाहन अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी व जखमीचे जीव वाचण्यासाठी तसेच वाहतुकांची कोंडी निर्माण झाले वर कसे पद्धतीने त्याच्या नियोजन करण्यासाठी मांजरसुंबा महामार्ग मदत पोलीस केंद्र तर्फे रंगीत तालीम घेण्यात आली.
या रंगीत तालीम मध्ये एखादा अपघात झाल्यावर तात्काळ महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ वर जावे अंबुलन्सला फोन लावून बोलून घेणे जखमींना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे व जवळ चे पोलीस स्टेशन ला अपघाताची माहिती देणे रोडवर वाहतूकांची कोंडी होऊ नये त्याची खबरदारी घेणे यासाठी औरंगाबाद सोलापूर महामार्ग वर मांजरसुंबा महामार्ग पोलीस मदत केंद्र तर्फे रंगीत तालीम घेण्यात आली होती. या रंगीत तालीम मध्ये मांजरसुंबा महामार्ग मदत पोलीस केंद्रचे पोलीस उपनिरीक्षक यशवंत घोडके साहेब, पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे साहेब, पोलीस कर्मचारी अल्ताफ शेख, पोलीस कर्मचारी दिक्कड, जयराम उडे, लक्ष्मण मुंडे, अनिल जाधव, फारुख भाई, विजय पवार, संजय काताडे, फुलचंद जाधव, मारुती साहेब, विकास थोरात, विलास ठोंबरे, बबन राठोड, अनिल तांदळे व या रंगीत तालीम मध्ये अग्निशामदल, म्बुलन्स डॉक्टर यांनी ही सहभाग घेतला होता

COMMENTS