Homeताज्या बातम्यादेश

तीन मुलांची आई तिच्या मैत्रिणी सोबत फरार

प्रेमात सर्वकाही न्याय्य असते असे म्हणतात. कदाचित त्यामुळेच बदलत्या समाजात प्रेमाची वेगवेगळी रूपे पाहायला मिळत आहेत. याचाच एक प्रकार उत्तर प्रदेश

माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांना जन्मठेप
जूनमध्येही दहावी, बारावीची परीक्षा देण्याची व्यवस्था
पुण्यात होता साखळी बॉम्बस्फोटाचा कट

प्रेमात सर्वकाही न्याय्य असते असे म्हणतात. कदाचित त्यामुळेच बदलत्या समाजात प्रेमाची वेगवेगळी रूपे पाहायला मिळत आहेत. याचाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये पाहायला मिळाला आहे. इथून एक विचित्र प्रेमकहाणी समोर आली आहे, जी ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल.उत्तर प्रदेशातील मैनपुरीत एक महिला आपल्या मैत्रिणीच्या प्रेमात पडली आणि तिने आपल्या पतीला सोडून मैत्रिणींसह फरार झाल्याची घटना घडली आहे. 

मैनपुरीमध्ये तीन मुलांची आई तिच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडली. हे पुरेसे नाही, ही महिला आपल्या मैत्रिणीच्या प्रेमात इतकी वेडी झाली की तिने आपल्या पतीलाही सोडले. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले, तरीही या महिलेला पतीसोबत राहायचे नाही. मैनपुरीच्या कुरावली ठाण्याच्या भागातील हविलीया गावात राहणाऱ्या वंदनाची कुरवली पोलीस स्टेशन हद्दीतील हवेलिया गावातील खुशबू या महिलेशी मैत्री होती. अनेकदा वंदना खुशबूला भेटायला यायची. यादरम्यान दोन मित्रांमधील प्रेम वाढतच गेले खुशबूचा पती त्यांच्या भेटण्यावर विरोध करायचा त्याला वंदनाचे घरी येणे पटत नव्हते. दरम्यान खुशबू आपल्या तीन मुलांना घेऊन बेपत्ता झाली. नंतर कळले की वंदना देखील पसार झाली आहे. 

COMMENTS