Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पनवेलमध्ये अल्पवयीन मुलीवर सलग दोन वर्ष अत्याचार

पनवेल/प्रतिनिधी ः रायगड जिल्ह्यातील पनवेल जिल्ह्यातून संतापजनक घटना उघडकीस आली. शेजारी राहणार्‍या अल्पवयीन मुलीवर सलग दोन वर्ष अत्याचार केल्याप्र

अखेर संजय राऊत यांना अटक; पत्राचाळ घोटाळयात ईडीची कारवाई
 नवी मुंबईत निर्माण होत आहेत कबुतरखाने ; नागरिक त्रस्त
जैविक इंधनावर चालणारा किफायतशीर ड्रोन विकसित करावा ; केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी

पनवेल/प्रतिनिधी ः रायगड जिल्ह्यातील पनवेल जिल्ह्यातून संतापजनक घटना उघडकीस आली. शेजारी राहणार्‍या अल्पवयीन मुलीवर सलग दोन वर्ष अत्याचार केल्याप्रकरणी एका 50 वर्षीय रिक्षाचालकाला  अटक करण्यात आली.
याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा पनवेल येथील रहिवाशी असून रिक्षा चालवतो. आरोपीने 2020 ते 2022 या कालावधीत पीडितेवर अनेकदा अत्याचार केले. याप्रकरणी पीडिताच्या आईने स्थानिक पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दिली. तसेच पीडितासोबत घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांच्या कानावर घातला. यानंतर पोलिसांनी रविवारी रात्री आरोपीला अटक केली. पीडितेच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात भादंवि अंतर्गत कलम 376 आणि भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती एका पोलीस अधिकार्‍याने सोमवारी दिली. 

COMMENTS