अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून अत्याचार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून अत्याचार

अहमदनगर/प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून व पळवून नेऊन तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका जणाविरुध्द श्रीरामप

रंगकर्मीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार : अमित देशमुख
भीमजयंती दिनी डॉ.फुगारे यांच्या उपस्थितीत  पाणीवाटपाचे आयोजन
पालघरमध्ये लिव्ह-इन-पार्टनरची हत्या

अहमदनगर/प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून व पळवून नेऊन तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका जणाविरुध्द श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. बेलापूर-ऐनतपूर येथील एका अल्पवयीन मुलीस असलम मंजुर शेख याने आठ दिवसापूर्वी फूस लावून पळवून नेले होते. त्याबाबत बेलापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता.
अपहृत मुलगी ही देहरे येथे असल्याचे समजताच पोलिस त्या ठिकाणी पोहोचले, नातेवाईकांनी त्या मुलीस पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी पळवून नेणारा असलम शेख यास ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्ह्यात बाल लैंगिक अत्याचार व पोस्को आदी वाढीव कलम लावण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील व सहकार्‍यांनी त्या मुलीचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले व काही वेळातच पळवून नेणार्‍या असलम शेखला ताब्यात घेतले.

COMMENTS