अहमदनगर/प्रतिनिधी : येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये कामाला असलेल्या अल्पवयीन मुलीला त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणार्या युवकाने मुंबईला पळवून नेत तिच्याव
अहमदनगर/प्रतिनिधी : येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये कामाला असलेल्या अल्पवयीन मुलीला त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणार्या युवकाने मुंबईला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी त्या युवकाला अटक केली आहे. सलमान बशीर शेख (वय 21, रा. जालना. हल्ली रा. कोठला) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. संबंधित मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. आता यामध्ये वाढीव कलम लावण्यात आले आहे. पीडित अल्पवयीन मुलगी व तिच्या आईने पोलिसांत जबाब दिला आहे. आरोपी सलमान शेख याच्या विरोधात लैंगिक अत्याचार, पोक्सो व अॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती अशी की, अहमदनगर शहरात राहणारी अल्पवयीन मुलगी एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करीत होती. यादरम्यान तिची सलमान शेख याच्यासोबत ओळख झाली. सलमान याने तिच्यासह तिच्या घरच्यांना धमकावत तिला मुंबई येथे पळवून नेले व तेथे त्या मुलीवर अत्याचार केला. दरम्यान अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी तिच्या घरच्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांकडून गुन्हा करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांच्या पथकाने अल्पवयीन मुलीसह त्या युवकाचा शोध घेतला. ते मिळून आल्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीसह तिच्या आईचा जबाब नोंदविला तसेच पूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात अत्याचार, पोक्सो, अॅट्रॉसिटी कलमे वाढवण्यात आली आहेत. याप्रकरणी अधिक तपास नगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे करीत आहेत.
COMMENTS