Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड शहरात अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

जामखेड ः जामखेड शहरातील तपनेश्‍वर परीसरात रहात असलेल्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची 4 मार्च रोजी घटना घडली आहे. सदर मुलीस आत्मह

गर्लफ्रेंडने 1 लाख मागितल्याने प्रियकराची आत्महत्या
सावेडीतील युवकाची घरात गळफास घेऊन आत्महत्या
जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

जामखेड ः जामखेड शहरातील तपनेश्‍वर परीसरात रहात असलेल्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची 4 मार्च रोजी घटना घडली आहे. सदर मुलीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी शरद हनुमंत ढाळे व महादेव विष्णु ढाळे दोघे. रा. तेलंगशी ता. जामखेड या दोघांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत मूलीचे वडील बजरंग बापु भोंडवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मयत अल्पवयीन मुलगी ही तेलंगशी येथे मामाकडे शिक्षणासाठी रहात होती तर तिचे माध्यमिक शिक्षण खर्डा येथे झाले आहे. ती इयत्ता 12 वी ची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मामाकडे शिक्षण घेत असतानाच तेलंगशी गावातील शरद हनुमंत ढाळे हा तिला वेळोवेळी त्रास देऊन छेडछाछ करीत होता. ब्लँकमेल करत होता. तर त्याचा चुलत भाऊ महादेव विष्णु ढाळे हा मुलीला पळवुन घेऊन जा असे सांगत होता. मुलीला संबधित आरोपी त्रास देत असल्याने वडिलांनी तिला पुणे येथील तिच्या मोठ्या बहीणीकडे रहाण्यास पाठवले होते. मात्र तरी देखील संबधित आरोपी हे पुणे येथे मुलगी रहात आसलेल्या ठिकाणी येऊन त्रास देत होते. त्यामुळे सदर मुलीस पुन्हा जामखेड येथे आपल्या आई वडिलांकडे आणण्यात आले होते. यावेळी मुलगी ही मानसिक टेन्शनमध्ये होती. सोमवार दि 4 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वा. मुलीचे वडील बाहेर कामाला गेले होते तर तिची आई घराच्या बाहेर भांडी घासत होती. आई भांडी घासुन घरात गेली असता मुलीने घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसले. लटकलेल्या अवस्थेत दिसलेल्या मुलीला पाहुन आरडाओरडा केला. नंतर मयतावर जामखेड ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. यानंतर मयत मुलीच्या बहीणीला आपल्या लहान बहीणीने आत्महत्या करण्याच्या काही दिवस आगोदर पुणे येथे आपल्या घरी एका वहीत चिठ्ठी लिहुन ठेवली आसल्याचे आढळून आले आहे. या चिठ्ठी मध्ये माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर यास शरद ढाळे हा जबाबदार असेल असे लिहुन ठेवले होते. तसेच संबधित आरोपी देखील तिला त्रास देत असल्याने अखेर पिडीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शरद हनुमंत ढाळे व महादेव विष्णु ढाळे. दोघे रा. तेलंगशी ता. जामखेड अशा दोन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला आत्महतेस कारणीभूत ठरल्या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत. 

COMMENTS