अहमदनगर/प्रतिनिधी ः महालक्ष्मी वरखेड देवी (तालुका नेवासा) यात्रा दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. या यात्रेत भाविक भक्तांना सुविधा मिळत नसल्

अहमदनगर/प्रतिनिधी ः महालक्ष्मी वरखेड देवी (तालुका नेवासा) यात्रा दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. या यात्रेत भाविक भक्तांना सुविधा मिळत नसल्याने शासनाकडे मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यांचा आढावा घेण्यासाठी मातंग समाजाची बैठक उद्या रविवारी (दि. 19 मार्च) सकाळी साडेअकरा वाजता औरंगाबाद रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहावर होणार असल्याची माहिती नामदेवराव चांदणे यांनी दिली आहे.
महालक्ष्मी वरखेड देवी यात्रेच्या काळात भाविक भक्तांना जागा मिळत नसल्याने मोठी खाण बुजवून जागा उपलब्ध करून द्यावी, पाण्याचे टँकर जादा प्रमाणात वाढविण्यात यावेत, यात्रेच्या काळात ज्यादा पोलिस बंदोबस्त वाढविण्यात यावा, यात्रेच्या परिसरातील अवैध धंदे दारू, जुगार, मटका, सोरट बंद करण्यात यावे, शिरसगाव ते वरखेड रस्ता अरुंद असून यावर खड्डे पडल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा या मागण्यांसाठी सकल मातंग समाजाच्यावतीने सोमवारी दिनांक 27 मार्च 2023 रोजी दुपारी 12 वाजता खडका फाटा (नेवासा) येथे रस्ता रोको करण्यात येणार आहे. या नियोजनासाठी मातंग समाजाची बैठक रविवारी 19 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह (अहमदनगर) येथे आयोजित केले आहे. सर्वांनी या बैठकीत उपस्थित राहण्याचे आवाहन नामदेवराव चांदणे (मोबा.9270043696) यांनी केले आहे.
COMMENTS