सातारा शहरातील बुधवार पेठ परिसरात असलेल्या प्लायवूडच्या गोडवूनला भीषण आग 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा शहरातील बुधवार पेठ परिसरात असलेल्या प्लायवूडच्या गोडवूनला भीषण आग 

सातारा प्रतिनिधी - सातारा शहरातील बुधवार पेठ परिसरामध्ये असलेल्या एका प्लायवूडच्या गोडवूनला आज सकाळच्या सुमारास अचानक शॉक सर्किटमुळे भीषण आग लागल्य

तरुणांनी चक्क हातात सिलेंडर फायर करत केला जल्लोष
कोपर्डी बलात्कारातील मुख्य आरोपीची आत्महत्या
अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात जात पडताळणी प्रस्ताव स्वीकृती व प्रमाणपत्राचे वाटप

सातारा प्रतिनिधी – सातारा शहरातील बुधवार पेठ परिसरामध्ये असलेल्या एका प्लायवूडच्या गोडवूनला आज सकाळच्या सुमारास अचानक शॉक सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये गोडवून मधील साहित्य जाळून खाक झाल्याने लाखोचे नुकसान झाले आहे. तर या आगीवर सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या साह्याने स्थानिक नागरिकांनी नियंत्रण मिळवले आहे. अचानक लागलेल्या आगीमध्ये कोणतीही जीवन हानी झाली नसून घटनास्थळी बग्याची मोठी गर्दी झाली आहे. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचा पंचनामा करण्यास सुरुवात केला आहे. सातारच्या बुधवार पेठ परिसरामध्ये असलेल्या प्लायवूडच्या गोडाऊनमधून आगीचे लोट बाहेर येत असल्याची माहिती काही स्थानिक नागरिकांना मिळाले होते. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून ही आग विझवण्यामध्ये यश मिळवला आहे. ही आग शॉक सर्किट मुळे लागल्याची प्राथमिक माहिती पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांकडून देण्यात आले आहे. तर या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून या घटनेचा अधिक तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.

COMMENTS