Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात धडकला मोर्चा

अहमदनगर शहरात सकल हिंदू समाजाने केला रोष व्यक्त

अहमदनगर/प्रतिनिधी ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणार्‍यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर शहरातील सकल हिंदू सम

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौर्‍यावर
 एसएससी बोर्डाच्या परीक्षेला आजपासुन सुरुवात
पोलिस नियंत्रण कक्षातील महिला पोलिसाची आत्महत्या

अहमदनगर/प्रतिनिधी ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणार्‍यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर शहरातील सकल हिंदू समाज बांधवांकडून निषेध मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केला. या मोर्चाची सुरुवात माळीवाडा बस स्टॅन्ड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाली. या मोर्चात हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले पोलिस बंदोबस्तात या मोर्चाला सुरुवात झाली. या वेळी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोर्चेकर्‍यांनी हातात भगवे झेंडे घेवून मोर्चात सहभाग नोंदवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणार्‍यांचा तीव्र निषेध केला. या वेेळी बाजारपेठेतील दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली होती.
बुधवारी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. बसस्थानक, माळीवाडा वेस, आशा टॉकीज चौक, माणिक चौक, कापडबाजार, तेलिखुंट, चितळे रोड मार्गे दिल्लीगेट पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या मार्गावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चा मार्गाला जोडणारे रस्ते बॅरीकेट लावून बंद करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी सकाळपासून ठिकठिकाणी भेट देत बंदोबस्ताची पाहणी केली. शहरात मुकुंदनगर परिसरातील एका विकृत तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आणि त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर शहर आणि जिल्ह्यात संतापाची लाट पसरलेली असून, या तरुणाला अवघ्या अर्ध्या तासात स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकलेल्या असून त्याला 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आरोपीच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध म्हणून तमाम शिवप्रेमी बांधवांनी माळीवाडा एसटी स्टँड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जमून आरोपीवर कारवाईसाठी सकाळी 11 वाजता मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तरुणावर कारवाईसाठी येथून मोर्चा देखील काढण्यात आला. शिवप्रेमी बांधवांनी येथे उपस्थित राहून जय श्रीराम, हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. सकाळी 11 च्या सुमारास नगर शहर आणि तालुकास्तरावरील अनेक शिवप्रेमी तरुणांनी यात सहभागी होत आपला संताप व्यक्त केला. मुस्लिम बांधवांनी देखील या घटनेचा कठोर शब्दात निषेध व्यक्त केला असून आरोपी तरुणावर कारवाईची मागणी पोलिसांकडे केलेली आहे. या मोर्चाचे नंतर सभेत रुपांतर झाले. यावेळी संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष मोरे व घोडके गुरुजी यांची भाषणे झाली. आ. संग्राम जगताप यांनी मोर्चात सहभागी होवून शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. मोर्चेकर्यांनी हातात भगवे झेंडे घेवून सहभाग नोंदवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणार्याचा निषेध केला.

COMMENTS