हल्लाच्या निषेधार्थ पाथर्डी बंद ठेवत पोलिस ठाण्यावर सर्वपक्षीय नेत्यांचा मोर्चा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हल्लाच्या निषेधार्थ पाथर्डी बंद ठेवत पोलिस ठाण्यावर सर्वपक्षीय नेत्यांचा मोर्चा

पाथर्डी प्रतिनिधी - माजी नगराध्यक्ष सुभाष मामा घोडके,प्रताप ढाकणे आम्ही पक्षीय राजकारण बाजूला ठेवत तालुक्यातील हितासाठी एकत्र येत होतो.आजही आपण तालु

सहज ध्यानाने कौटुंबिक स्वास्थ लाभते – सौ. सविता सोनवणे
अहमदनगरचे जिल्हाधिकारी झारीतील शुक्राचार्य…
लोखंडी रॉडने मारहाण,कोपरगावात नऊ जणांवर गुन्हा दाखल

पाथर्डी प्रतिनिधी – माजी नगराध्यक्ष सुभाष मामा घोडके,प्रताप ढाकणे आम्ही पक्षीय राजकारण बाजूला ठेवत तालुक्यातील हितासाठी एकत्र येत होतो.आजही आपण तालुक्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेसाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवत एकत्र येत प्रशासनाला आपली सर्वपक्षीय ताकत दाखवण्याची वेळ असल्याचा मार्मिक सल्ला माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी दिला.

गुरुवारी सायंकाळी शहरातील सराफ व्यापारी बंडूशेठ चिंतामणी यांच्यावर चोरीच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला करण्यात आला.याच्या निषेधार्थ पाथर्डी शहरातील सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व व्यापारी संघटनांनी पाथर्डी बंदची हाक दिली होती.सकाळी दहा वाजता शहरातील नवी पेठ येथून मोर्चाला सुरुवात झाली.पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.या ठिकाणी मोर्चे करांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

या घटनेबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात अभिषेक राजेंद्र चिंतामणी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या हल्ल्यात केवळ तिजोरीची चाव्या चोरट्यांनी पळवल्या आहेत.३९४,३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमवर हे तपास करत आहेत.

हा हल्ला चिंतामणी कुटूंबावर नसून आमच्या शहराच्या स्वाभिमानावर झालेला आहे.राजकारणी लोकांनी आपल्या अवतीभवती कोण बसतय हे तपासत मतांसाठी लोकांचे नुकसान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे.

लोकांचे नाव घेऊन आपण राजकारण करतो पण गावात लोकच सुरक्षित राहिले नाहीत तर आपल्या राजकारणाचा काय उपयोग? तसेच साहेब शहरात छेडछाड,रस्ता लूट,सोनसाखळी व मोबाईल चोरी,अतिक्रमणे,गुंडागर्दी कोण करत हे तुम्हाला माहिती आहे  ‘कानून के हात लंबे होते है’ याची प्रचिती देत तालुक्यातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करून व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षा मिळावी यासाठी आपण तात्काळ कडक पावले उचलावीत असे मत अँड.प्रताप ढाकणे यांनी व्यक्त केले.

                 अमोल गर्जे यांनी बोलताना म्हटले की,जुने स्थानक,नवीन स्थानक,कोरडगाव रोड,नगर रोड,शेवगाव रोड येथे रोजच चोरीच्या घटना घडत आहेत.त्या रोखण्याची जबाबदारी ही पाथर्डीतील राजकारणी,व्यापारी आणि नागरिक या सर्वांची आहे.चोरीच्या घटनेत फिर्यादी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आल्यानंतर त्यांची तत्काळ माहिती ही गुन्हेगाऱ्याला मिळते हे अतिशय धक्कादायक आहे.पाथर्डी ठाण्यात खोट्या गुन्ह्याची संख्या वाढली आहे.येणाऱ्या काळात राजकीय लोकांनी चुकीच्या घटनेत आपल्या स्वार्थासाठी हस्तक्षेप न करता अन्यायग्रस्तला न्याय देण्याची भूमिका घ्यावी.आज प्रत्येक व्यापारी भयभीत झाला असून तो स्थलांतराचा विचार करत असून त्याला धीर देत नेहमी त्यांच्या पाठीशी राहत व्यापारी वर्गाला स्थलांतर करू देणार नाही असे मत व्यक्त केले. यावेळी अँड.प्रताप ढाकणे यांच्यासह सुभाष घोडके,भाजपाचे राहुल राजळे,अभय आव्हाड, नंदकुमार शेळके,

विष्णुपंत अकोलकर,माणिक खेडकर,अमोल गर्जे,मृत्युंजय गर्जे, मुकुंद गर्जे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,बंडू बोरुडे,चांद मणियार,शिवसेनेचे विष्णुपंत ढाकणे,देविदास खेडकर,संतोष जिरेसाळ,भगवान दराडे,बडूशेठ भांडकर,नासिर शेख,अरविंद सोनटक्के,रत्नमाला उदमले,सविता भापकर,प्रसाद आव्हाड,प्रशांत शेळके यांच्यासह व्यापारी व शहरातील त्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

               पाथर्डी तालुक्यामध्ये पूर्णपणे गुंडाराज झाला असून कायद्याचा धाक कोणालाही राहिला नाही.फक्त वाहनधारकांना दंड करणे व सर्वसामान्यांना वेठीस धरणे,खोटे गुन्हे दाखल करणे.गुन्हेगारांशी संगनमत करून त्यांना पाठीशी घालने.अशा प्रकारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.यामुळे सामान्य नागरिकांना पोलिसांचा आधार वाटत नसून भीती वाटत आहे.जुने व नवीन बस स्थानक,सर्व मुख्य चौक,आठवडे बाजार या दिवशी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रकार घडत आहेत.यामुळे शहरातील व्यापारी पेठ उध्वस्त होत असून अनेक व्यापारी स्थलांतरांच्या मार्गावर आहेत.तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावे वाढत्या गुन्हेगारीमुळे ओस पडली आहेत.तरी येथील पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची गांभीर्याने चौकशी करावी.अशा प्रकारच्या संतप्त भावना विविध पक्षिय नेते व व्यापारी बांधवांनी व्यक्त केल्या.

   मोर्चाला उत्तर देताना पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी येत्या आठ दिवसांमध्ये आरोपींचा शोध घेऊन तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कायदेशीर कारवाई करु असे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला.

COMMENTS