पाथर्डी : तालुक्यातील कारेगाव येथे चारचाकी आणि दुचाकी मध्ये झालेल्या भीषण अपघातात आई ताराबाई कुंडलिक खेडकर आणि मुलगा सोमनाथ कुंडलिक खेडकर जागेवरच
पाथर्डी : तालुक्यातील कारेगाव येथे चारचाकी आणि दुचाकी मध्ये झालेल्या भीषण अपघातात आई ताराबाई कुंडलिक खेडकर आणि मुलगा सोमनाथ कुंडलिक खेडकर जागेवरच मयत झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घडली असून अपघातानंतर चारचाकी वाहनातील प्रवासी पसार झाले आहेत.
याबाबत प्राथमिक समजलेली माहिती अशी की, करोडी येथील रहिवासी असलेले ताराबाई कुंडलिक खेडकर आणि सोमनाथ कुंडलिक खेडकर हे त्यांच्या भोसे येथील नातेवाईकांकडे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रम संपवून हिरो कंपनीच्या एच एफ डीलक्स (गाडी क्रमांक एम.एच १६ डी.एच ३१५७) या दुचाकीने करोडी येथे या जात असताना समोरून येणाऱ्या टाटा कंपनीच्या सफारी (गाडी क्रमांक एम.एच १६ बी.एच ३१५२) चारचाकी गाडी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात जागीच ताराबाई खेडकर आणि सोमनाथ खेडकर या मायलेकाचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवले.याकामी सहायक पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण पवार,पोलीस नाईक सुहास गायकवाड,संदीप बडे तर रुग्णवाहिकेचे वाहक तौफिक मणियार यांनी मदत केली. दरम्यान,अँड.प्रताप ढाकणे यांना अपघाताची माहिती कळताच ढाकणे यांनी सहकाऱ्यांसह उपजिल्हा रुग्णालय गाठत नातेवाईकांशी चर्चा घटनेची माहिती घेत त्यांना मदत करत धीर दिला.
COMMENTS