Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडकरींसारख्या निष्ठावंत नेत्याला डावलले

उद्धव ठाकरेंनी भाजपवर डागली तोफ

मुंबई ः भाजप पक्ष आता निष्ठावंतांचा पक्ष राहिला नाही. भाजपने पहिल्या यादीत कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी दिली आहे, मात्र पक्षाचे निष्ठावंत नेते नि

इंडिया आघाडी एकसंधपणे लढणार
शंकरराव गडाख संकाटात साथ देणारा मित्र – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी सगळा महाराष्ट्र भ्रष्टाचार युक्त करून टाकला

मुंबई ः भाजप पक्ष आता निष्ठावंतांचा पक्ष राहिला नाही. भाजपने पहिल्या यादीत कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी दिली आहे, मात्र पक्षाचे निष्ठावंत नेते नितीन गडकरी यांचे नाव पहिल्या यादीत डावलले आहे, अशी टीका टाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी म्हटले  की, तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत फक्त घोषणा पोहोचतात प्रत्यक्षात मात्र काही नाही. तिथूनच या यात्रेची तुम्ही सर्वांनी सुरुवात केली. या सर्वांचे शिखर खोट्यावर आधारित आहे. जनतेपर्यंत आपण हे सगळे पोहोचवू यासाठी आपण एक शिबिर घेऊ. गडकरींसारखा निष्ठावंत कार्यकर्ता भाजपामध्ये दशकानुदशके आहे, पण त्यांचे नाव पहिल्या यादीत नाही. मात्र ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच भाजपने उमेदवारी दिली, असे म्हणत उद्धवे ठाकरेंनी भाजपावर हल्ला चढवला आहे. पंतप्रधानांचा फोटो लावून अनेक योजना आहेत. मात्र त्या प्रत्यक्षात कुठेही पोहोचत नाही. मी सगळ्यांशी बोलतोय त्यामध्ये वरपासून खालपर्यंत सगळे नाराज आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधत सांगितले की, डोळे असून काही अंधभक्त आहेत ते सोडून द्या. सर्वांमध्ये असंतोष आहे. ईव्हीएमने हे जिंकू शकतात. ईव्हीएममुळे हे जिंकत आहेतच, मात्र आता हे जिंकणार नाहीत, असा गैरसमज पसरवत आहेत. जनता हा लोकशाहीला सर्वात मोठा घटक आहे. जनतेच्या मनाविरुद्ध तोडाफोडाचे राजकारण भाजप करत आहेत. जनतेचा असंतोष असताना देखील ईव्हीएमच्या मदतीने हे जिंकले तर वाईट आहे. भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 195 लोकांची यादी जाहीर केली. नितीन गडकरी यांचें मी सुरुवातीपासून नाव ऐकत आहे, ज्या वेळेला मोदी, शाह यांची नावे ऐकली नव्हती. अशा माणसाचे नाव या यादीत नाही आहे. ज्या कृपाशंकर सिंहांवर यांनी आरोप केले त्यांचे या पहिल्या यादीत नाव आहे. शहरात जुन्या योजनांची नावे देखील बदलली. जुमलाचे नाव आता गॅरंटी झाल्याची टीका ठाकरे यांनी केली आहे.

COMMENTS