Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्राचार्य,उपप्राचार्य, प्राध्यापक,पत्रकार अशा बारा जोड्यांची नैनीतालची दुरची  टुर

आष्टी प्रतिनिधी - उन्हाळी सुट्टीतील कालावधीचा योग्य फायदा घेऊन आष्टीतील उच्चशिक्षित गुणी जणांनी नैसर्गिक जैवविविधतांची पाहणी करून आस्वाद घेण्यास

आव्हाड महाविद्यालयाच्या महिला खेळाडूंचे राज्यस्तरीय वेटलिफ्टींग यश
मोबाईलसाठी १२ वर्षाच्या मुलाने घेतला गळफास लावून | LOKNews24
कोरोना लस म्हणून दिले मिठाचे पाणी! तपासात धक्कादायक खुलासे l LokNews24

आष्टी प्रतिनिधी – उन्हाळी सुट्टीतील कालावधीचा योग्य फायदा घेऊन आष्टीतील उच्चशिक्षित गुणी जणांनी नैसर्गिक जैवविविधतांची पाहणी करून आस्वाद घेण्यासाठी दूरची टूर आरंभिली आहे.त्यांचा पुणे ते थेट दिल्ली विमान प्रवास आणि तेथील विविध डोंगररांगा झाडे व लक्षवेधी आणि गगनचुंबी इमारतीसह विविधता पाहून एक निसर्गाच्या चमत्कारिक घटनांचा आस्वाद घेतला आहे.
मे महिन्यात असा कडक उन्हाळ्याच्या दिवसांचा कालावधी.याच महिन्याच्या गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरातील आनंदराव धोंडे महाविद्यालयातील प्राचार्य व उपप्राचार्य,ज्येष्ठ प्राध्यापक, निवृत्त अधिकारी,कर्मचारी तसेच पत्रकार,वकील मंडळी यांच्या एकूण बारा जोड्या नैनीतालसाठी रवाना झाल्या आहेत.जिम कार्बर्ट टायगर रिझर्व एरिया,कौसानी आणि राणीखेत, नैनिताल,भीमताल,सातताल,दिल्ली एअरपोर्ट ड्रॉप असा त्यांचा प्रवास आहे.पुणे ते जयपूर विमान प्रवास आणि जयपूर ते दिल्ली विमान प्रवास आणि दिल्ली ते नैनीताल लक्झरी बस प्रवास अशी आठवडाभराची ही सहकुटुंब सहल आहे.या निसर्गसहलित मुख्य संयोजक प्राचार्य डॉ.हरिदास विधाते (कडा),प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ (आष्टी), उपप्राचार्य डॉ.भास्कर चव्हाण (कडा), उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. संभाजी वाघुले,उपप्राचार्य डॉ. बापू खैरे ,प्रा.भीमराव जिवे, प्रा.दिलीपराव बनसोडे (बीड), सेवानिवृत्त सेवायोजन अधिकारी अशोक गिरी (अहमदनगर),जयंत जोशी (अहमदनगर), कृषी अधिकारी बाळासाहेब रासकर (श्रीगोंदा), प्रा.डॉ.पंडितराव औटे,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे  या मान्यवरांनी यात्रीगण हालीडेज  अहमदनगर या यात्रा कंपनीमार्फत सपत्नीक टूर केली आहे.अचानक युवा नेते अजय भीमराव धोंडे हे नैनीतालला भेटले. त्यांच्यासोबत फोटोशेषन झ़ाले.
नैसर्गिक डोंगररांगा ही निसर्गाची मानवाला अनमोल देण!
मानवी जीवन व्यवस्थेला भारत मातेच्या विविध भागांमध्ये विविध डोंगर रांगा ,झाडा, फुलांनी वेढलेले परिसर त्यातून विविध रस्ते इमारती आणि अशा उपक्रमांनी नटलेले हे विश्व म्हणजे मानवी जीवनाला निसर्गाने दिलेली ही फार मोठी देणगी आहे अशी प्रतिक्रिया या नैसर्गिक सहलीतील सहभागी जेष्ठ प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी व्यक्त केली.

COMMENTS