Homeताज्या बातम्यादेश

घाटात भलामोठा दगड कारवर आला दोघांचा मृत्यू, 3 जण जखमी

नागालँड - पावसाळ्यात घाटात किंवा डोंगराळ भागात गाडी चालवतांना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका सर्वाधिक असतो.

नगरपालिकेच्या घंटा गाडीला लागली आग
टीम इंडियाला आशिया कपमधील सुपर फोरमधील सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
प्रामाणिक मिळकत धारकांची बक्षीसे कागदावरच

नागालँड – पावसाळ्यात घाटात किंवा डोंगराळ भागात गाडी चालवतांना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका सर्वाधिक असतो. नागालँडमध्ये अशीच एक दरड कोसळण्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहिती या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 3 जण जखमी आहेत. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.राष्ट्रीय महामार्ग 29 वरील दिमापूर-कोहिमा चौपदरी रस्त्यावर चुमौकेडिमा येथे दरड कोसळली आहे. कारच्या मागे असलेल्या कारच्या डॅश कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. व्हिडीओतील दृष्यांनुसार एक भलमोठा दगड डोंगळावरून खाली येतो. या दगडाच्या मार्गात असलेल्या दोन वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. दोन गाड्यांमधील दोघांचा यात मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी आहेत.जखमींना वैद्यकीय उपचारासाठी दिमापूर येथील ख्रिश्चन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस अँड रिसर्च रुग्णालयात नेण्यात आले आहे. मौकेडिमा परिसरातील जुन्या पोलीस चौकी गेटजवळ सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.भूस्खलनात चार वाहनांचे नुकसान झाले. यामुळे मार्गावरील वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. हळूहळू रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

COMMENTS