Homeताज्या बातम्यादेश

लडाखमध्ये हिमस्खलनात एका जवानाचा मृत्यू

तीन जवान बेपत्ता लष्कराकडून बचावकार्य सुरू

लडाख/वृत्तसंस्था : गिर्यारोहनाचे प्रशिक्षण जवानांना देत असतांना लडाखमधील माउंट कूनजवळ हिमस्खल झाल्याने एका जवानाचा मृत्यू झाला तर तिघे जण बेपत्ता

तर, राज्यपालांनी संवैधानिक पद उबवू नये!
बैलगाडी शर्यतीला राज्यशासनाकडून पाठबळ मिळावे यासाठी प्रयत्न करणार – राज्यमंत्री कु.आदिती तटकरे
हॉटेल व्यावसायिकावर तलवार, रॉडने हल्ला

लडाख/वृत्तसंस्था : गिर्यारोहनाचे प्रशिक्षण जवानांना देत असतांना लडाखमधील माउंट कूनजवळ हिमस्खल झाल्याने एका जवानाचा मृत्यू झाला तर तिघे जण बेपत्ता झाले आहे. या बेपत्ता जवानांचा शोध सुरू आहे. सध्या बचाव कार्य सुरू असल्याची माहिती लष्करी अधिकार्‍यांनी दिली.
लडाखमधील कुन पर्वतावर सोमवारी भारतीय लष्कराच्या गिर्यारोहकांचा एक गट हिमस्खलनात अडकला. या अपघातात लष्कराचा एक जवानाचा मृत्यू झाला तर तिघे जण बेपत्ता आहेत. बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. भारतीय लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल (एचएडब्ल्यूएस) आणि लष्कराच्या आर्मी अ‍ॅडव्हेंचर विंगमधील सुमारे 40 लष्करी जवानांची एक तुकडी माउंट कुनजवळ गिर्यारोहण प्रशिक्षण घेत होती. मात्र, 8 ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण चढाईदरम्यान लष्कराच्या तुकडीला हिमस्खलनाला सामोरे जावे लागले. तिबेटमधील डोंगराच्या उतारावर हे हिमस्खलन झाले. यात अमेरिकन गिर्यारोहक अण्णा गुटू आणि नेपाळी मार्गदर्शक मिंगमार शेर्पा यांच्या मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर आणखी दोघे बेपत्ता आहेत. चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार, शनिवारी दुपारी तिबेटच्या माउंट शिशापंगमा येथे 7600 मीटर (24.934 फूट) आणि 8 हजार मीटर (26,246 फूट) हिमस्खलन झाले. नेपाळचे शेर्पा कर्मा गेल्झेन हे गंभीर जखमी झाले आहेत. बचाव पथकाने त्यांना डोंगरावरून खाली आणले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. अमेरिका, ब्रिटन, जपान आणि इटलीसह विविध देशांतील एकूण 52 गिर्यारोहक या पर्वतावर चढण्याचा सराव करत होते. मात्र तेथे हिमस्खलन झाले.

COMMENTS