अकोले ः अकोले तालुक्यातील मुथाळणे (पागिरवाडी) येथे पोपट बंडू हळकुंडे यांच्या घराला काल रात्री गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली होती, त्या आगीत य

अकोले ः अकोले तालुक्यातील मुथाळणे (पागिरवाडी) येथे पोपट बंडू हळकुंडे यांच्या घराला काल रात्री गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली होती, त्या आगीत या परिवाराचे अंगावरील कपडे सोडता सर्व काही जळून खाक झाले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती माजी आमदार वैभवराव पिचड यांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट देत त्या परिवारास आवश्यक ती मदत करू असे सांगत त्या परिवारास धीर दिला.
भारतीय जनता पक्ष कार्यालय अकोले येथे शनिवारी वैभवराव पिचड मित्र मंडळाच्या वतीने त्या परिवारास संसार उपयोगी वस्तू, किचन मध्ये स्वयंपाकाला लागणारे सर्व साहित्य, महिनाभर पुरेल इतका किराणा माल, भाजीपाला व घरासाठी लागणारे साहित्याही उपलब्ध करून दिले. अकोले तालुक्यातील सामाजिक संस्थानी, दानशूर व्यक्तींनी या परिवारास शक्य होईल ती मदत करावी असे आव्हाननही माजी आमदार वैभवराव पिचड यांनी अकोलेकरांना केले आहे. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते गिरजाजी जाधव,अमृतसागर दूध संघांचे व्हाईस चेअरमन रावसाहेव वाकचौरे, भाजपा तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे, राजाभाऊ कानकाटे, भाजप ओबीसी चे तालुकध्यक्ष गोकुळ कानकाटे चक्रधर सदगीर, तालुका सरचिटणीस सचिन जोशी,उपाध्यक्ष माधव भोर,साहेबराव दातखिळे, सचिन उगले, अशोक आवारी आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS