Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनंजय मुंडे यांना जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर असणारे प्रेम दाखवण्याची मोठी संधी-पुजा मोरे

गेवराई - ना. धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर त्याना कृषी खाते जाहीर झाले आहे. त्यामुळे बीड जिल्हयाचा प्रलंबित खरीप 20

करुणा मुंडे राजकारणात उतरून धनंजय मुंडेंविरोधात लढणार…; नगरला केली शिवशक्ती सेना पक्षाची घोषणा
तलवारीने केक कापणे तरुणाला पडले महागात | LokNews24
Indapur : इंदापूरात चपली चोरणाऱ्या महिलांची टोळी सक्रिय (Video)

गेवराई – ना. धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर त्याना कृषी खाते जाहीर झाले आहे. त्यामुळे बीड जिल्हयाचा प्रलंबित खरीप 2020 च्या पिकविम्याचा प्रश्न तात्काळ मंजूर करा आणि जिल्हातील शेतकर्‍यांप्रती प्रेम दाखवून दया असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे यांनी ना. धनंजय मुंढे यांच्याकडे केले आहे.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळातील राजकीय समीकरने नव्याने बदलल्यानंतर बीड जिल्ह्याला मंत्री पद मिळाले. धनंजय मुंढे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना कोणते खाते मिळते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यांचे खाते जाहीर होऊन त्यांना कृषी खाते मिळाल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.  महाविकास आघाडी सरकारच्या काळात धनंजय मुंढे पालकमंत्री असतांना बीड जिल्ह्यात कोणतीही पिकविमा कंपनी विमा भरुन घेण्यास तयार नव्हती. त्यानंतर अनेक प्रयत्नांनी जिल्हयाला भारतीय कृषिविमा कंपनी लागू करण्यात आली. याच काळात पिकविम्याचा बीड पॅटर्न राजभरात गाजला. या पॅटर्न अंतर्गत विमा भेटत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे यांनी विरोध देखील दर्शवला. त्यावेळचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या घरावर येन दिवाळीच्या दिवशी मोर्चा काढला. पुण्याच्या कृषी आयुक्त कार्यलावर ठिय्या दिला तसेच अधिवेशन चालू असताना विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले येवढा संघर्ष करुनही ना. धनंजय मुंढे हे हा विमा मिळवून देण्यात अपयशी ठरले म्हणून आता दुसर्‍या जिल्ह्यात जाऊन कृषी मंत्र्याना भेटण्याची गरज पडणार नाही. बीड जिल्ह्याला कृषी मंत्री पद भेटले याचा प्रचंड आनंद आहे त्यामुळे ना. धनंजय मुंढे यांनी रखडलेला 2020 खरीप पिकविमा मंजूर करून जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर असणारे प्रेम दाखवून द्यावे तरच तुम्ही खरच जनतेच्या विकासासाठी अजित दादांसोबत सत्तेत सामील झालात असे आम्ही समजू, असे आवाहन स्वाभिमनीच्या प्रदेशाध्यक्ष तथा गेवराई पंचायत समिती सदस्य पूजा मोरे यांनी केले आहे.

COMMENTS