पंढरपूर प्रतिनिधी - पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेचे अमृत महोत्सव वर्ष आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कवठेकर प्रशाला, द.ह कवठेकर प्र
पंढरपूर प्रतिनिधी – पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेचे अमृत महोत्सव वर्ष आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कवठेकर प्रशाला, द.ह कवठेकर प्रशाला, आदर्श बाल व प्राथमिक मंदिर व पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने पंढरपुरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये सुमारे 5000 हून अधिकचे विद्यार्थी सहभागी झाले होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अमृत महोत्सवी वर्ष प्रारंभाचे औचित्य साधून पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखातील सुमारे 5000 अधिकच्या विद्यार्थ्यांनी शहरात शोभायात्रा काढली. यामध्ये लेझीम ढोल ताशाच्या गजरामध्ये ही शोभायात्रा निघाली. दानपट्टा मर्दानी खेळ तसेच विविध राज्यांच्या व विविध संस्कृतीच्या वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत होते. यावेळी भारतीय संविधानाची ग्रंथ दिंडी देखील काढण्यात आली. त्याचबरोबरने महापुरुषांच्या प्रतिकृती यासह विविध वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी पंढरपूरकरांचे लक्ष वेधून घेतले.
COMMENTS