छ. संभाजीनगर- विवाह हा मनुष्य जीवनातील 16 संस्कार पैकी एक अत्यंत महत्त्वाचा असा संस्कार आहे. विवाहप्रसंगी मनुष्य त्याच्या सर्व परी करण्याचा प्
छ. संभाजीनगर- विवाह हा मनुष्य जीवनातील 16 संस्कार पैकी एक अत्यंत महत्त्वाचा असा संस्कार आहे. विवाहप्रसंगी मनुष्य त्याच्या सर्व परी करण्याचा प्रयत्न करतो व अनावधानाने अनावश्यक असा खर्च करत असतो. वेळप्रसंगी कर्ज घेऊन सुद्धा विवाहाचे मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. या अनावश्यक खर्चाला मात देण्यासाठी भाग्यश्री फाउंडेशन व जायंटस् ग्रुप ऑफ़ छ. संभाजीनगर प्राइड च्या संयुक्त विद्यमाने सामूहिक विवाहाचे आयोजन दिनांक ०२.०६.२०२४, रविवार रोजी छ. संभाजीनगर येथे करण्यात आलेले आहे. यामध्ये इच्छुक जोडप्यांचा सामूहिक विवाह हिंदू धार्मिक पद्धतीने करण्यात येणार आहे. यापूर्वी वर्ष 2018 मध्ये 33 जोडप्यांच्या सामूहिक विवाह जायंटस प्राइड तर्फे यशस्वीरित्या करण्यात आला होता.
वधू-वरास संसार उपयोगी साहित्य देन्यात येनार आहे. यामध्ये गरजू, शेतकरी, नैसर्गिक आपत्तीग्रस्त, मजूर प्रवर्ग इत्यादीना प्राधान्य देण्यात येईल असे आवाहन आयोजकां तर्फे करण्यात आलेले आहे. सर्व इच्छुक वधू वर परिवारांनी ह्या सामूहिक विवाह कार्यक्रमात आपल्या मूलांचा विवाह करावा असे आव्हान आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. नाव नोंदणीची अंतिम तारीख १५ मे २०२४ आहे. अधिक माहिती व नाव नोंदीसाठी श्री गोपाल सारडा यांना मो # ९८२३०१२३५१ व श्री सचिन चव्हाण M# ७८८७८८८३९७ वर संपर्क साधावा व ह्या संधीचा लाभ घ्यावा.
COMMENTS